
पोळीला सॉफ्ट करण्यासाठी करा या पद्धतीचा वापर
नागपूर : भारतीय संस्कृतीत अन्नाला सर्वोच स्थान आहे. कोणत्याही परिस्थितीत अन्नाचा अपमान केला जात नाही. जेवणात भाजी, पोळी, वरण व भात असते. पाहुण्यांसाठीही हाच पाहुणचार केला जातो. गरम गरम पोळी खाण्याची मजा काही औरच असते. मात्र, तीच पोळी थंड झाली की कडक येते. मग ती खाण्यात काहीही मजा राहत नाही. अशावेळी अनेकजण पोळीचे तुकडे करून खातात. मात्र, आज आपण थंड पोळी कशी सॉफ्ट राहील हे पाहूया... (Roti-Soft-Roti-Recipe-Tips-cooking-tips-nad86)
गरम आणि ताजी पोळी प्रत्येकाला खायला आवडते. अनेकांच्या घरी सकाळी आणि रात्री पोळी बनतच असते. गोल आणि मऊ पोळी बनवण्यासाठी अनेकजण लहानपणापासूनच प्रशिक्षण घेतात. मुली लहान असतानाच आई पोळी तयार करण्याचे प्रशिक्षण देत असते. मात्र, अनेकांना चांगल्या पोळी तयार करता येत नाही. अनेकांच्या पोळ्या कच्च्या राहतात. तर अनेकांच्या पोळ्या वातळ होतात. मग जेवताना ती मजा येत नाही. अशावेळी काही साठवण्याच्या युक्त्यांचा अवलंब केल्यास पोळी बऱ्याच काळासाठी मऊ राहू शकते.
पिठात करा तुपाचा वापर
पोळी तयार करण्यासाठी पीठ मळताना आपल्यापैकी अनेकजण तेल किंवा मिठाचा वापर करतात. असं केल्याने पोळी मऊ राहील आणि थोडी चव येईल असा त्यामागचा उद्देश असतो. परंतु, पीठ मळताना तेल किंवा मिठाचा वापर न करता तूप वापरा. मात्र, जास्त तूप टाकू नका. पोळी मऊ करण्यासाठी फक्त अर्धा चम्मच तूप टाका.
हेही वाचा: जुळ्या बहिणींनी वयाच्या अकराव्या वर्षी उभा केला व्यवसाय
कणीक झाकून ठेवा
पोळी शिजवताना काळी पडत असेल तर अतिरिक्त पॅराथन (कोरड पीठ) काढून टाका. तसेच पीठ मळून जास्त वेळ सोडू नका. कणिकला जास्त हवा लागली तर ती काळी होते. पोळी मऊ होण्यासाठी कणीक झाकून ठेवणे आवश्यक आहे. कणीक ओल्या कापडाने झाकून ठेवली तर काळी होणार नाही आणि कडक होणार नाही.
पीठ चाळून घ्या
पिठाची योग्य पद्धतीने चाळणी केली नाही तरी पोळी कठोर होईल. कणिकमध्ये मीठ घालत असाल तर १/४ किंवा १/२ चमच्यापेक्षा जास्त मिसळू नका. कारण, जास्त मीठ आरोग्यासाठी चांगले नाही. नेहमी कणीक सॉफ्ट मळा. तुम्ही कणीक कडक चोळली तर पोळी कधीही चांगली होणार नाही. पीठ मळताना हळूहळू पाणी टाका. एकाचवेळी पाणी घातल्याने पीठ ओले होईल किंवा कडक होईल. पीठ मळताना तूप घालायला विसरले तर पीठावर तूप लावा आणि कापडाने झाकून ठेवा. यामुळे कणीक मऊ होईल आणि पोठी मऊ होईल.
(Roti-Soft-Roti-Recipe-Tips-cooking-tips-nad86)
Web Title: Roti Soft Roti Recipe Tips Cooking Tips
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..