रेसिपी : कांद्याच्या पातीचे ठेपले

हे ठेपले टोमॅटो सॉस/ लोणी/ दही अथवा कोणत्याही चटणीबरोबर अतिशय रुचकर लागतात.
कांद्याच्या पातीचे ठेपले
कांद्याच्या पातीचे ठेपलेsakal

साहित्य : ‌२ वाटी गव्हाचे पीठ, २ चमचे चण्याचे पीठ (बेसन), १ लहान वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात, पाव लहान वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, ४ हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आले, ५ ते ६ लसूण पाकळ्या यांची एकत्रित पेस्ट, चवीनुसार मीठ, १ चमचा हळद, १ चमचा हिंग, २ चमचे पांढरे तीळ, १ चमचा ओवा, २ चमचे गरम तेलाचे मोहन, कोमट पाणी, १ चमचा धणे पावडर, २ चमचे चाट मसाला, साजूक तूप / तेल किंवा अमूल बटर.

कृती : वरील सर्व जिन्नस एकत्र करून मध्यमसर घट्ट पीठ मळून १५ ते २० मिनिटे मुरत ठेवावे.

नंतर मध्यम आकाराचे ठेपले लाटून मंद आचेवर आवडीनुसार साजूक तूप/ तेल अथवा अमूल बटर कडेने सोडून मध्यम बदामी रंगावर भाजावे.

हे ठेपले टोमॅटो सॉस/ लोणी/ दही अथवा कोणत्याही चटणीबरोबर अतिशय रुचकर लागतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com