Recipe : स्वादिष्ट अन् आरोग्यदायी शाही पनीर रेसिपी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Recipe

Recipe : स्वादिष्ट अन् आरोग्यदायी शाही पनीर रेसिपी

जर तुम्हाला पनीर आवडत असेल तर शाही पनीर बनवा. या भाजीचं नावच नाही तर चव पण शाही आहे. शाही पनीरचा गोडवा लहान मुलांनापण आवडतो. बरेच लोक हॉटेलमध्येच पनीर खातात. पण या रेसिपीने तुम्ही घरीपण पनीर खाण्याचे शोकीन व्हाल.

हेही वाचा: Food Recipe : घरच्या घरी बनवा रेस्टॉरंटसारखा White Sauce Pasta

साहित्य

 • त्रिकोणी आकारात कापलेले पनीर ३०० ग्रॅम

 • कांदा २५० ग्रॅम

 • काजू १०० ग्रॅम

 • वेलची ४ लहान

 • हिरवी मिर्ची २

 • तेज पान १

 • बटर ५० ग्रॅम

 • आले लसूण पेस्ट ५० ग्रॅम

 • दही १०० ग्रॅम

 • पांढरी मिरे पूड अर्धा स्पून

 • फ्रेश क्रीम ५० ग्रॅम, मीठ चवीनुसार

 • चिरलेली कोथिंबीर

कृती

 • ग्रेव्हीसाठी कांदा, काजू, वेलची, हिरवी मिर्ची उकळवून घ्या.

 • नंतर मिक्सरमध्ये बारिक करून घ्या.

 • पॅन मध्ये बटर गरम करून आले लसूण पेस्ट टाकून परतून घ्या.

 • आता तेलात कांदा आणि इतर सामग्रीची पेस्ट टाका.

 • आता यात दही टाकून नीट मिक्स करा.

 • ५-१० मिनीट शिजवा आणि जेंव्हा मसाला तेल सोडायला लागेल तेंव्हा हवे तेवढे पाणी घालून ग्रेव्ही बनवा.

 • पांढरी मिरे पूड, मीठ व पनीरचे तुकडे घाला. आता फ्रेश क्रिम टाकून गॅस बंद करा.

 • कोथिंबीर व बदामाचे तुकडे टाकून सजवा.

Web Title: Shahi Paneer Recipe Health And Tasty

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..