

Rich & Creamy Shahi Tukda: Perfect Mughlai Sweet Dish for Special Occasions
esakal
Royal Mughlai Dessert: गणेशोत्सवाचा मंगलमय उत्साह सगळीकडे ओसंडून वाहत असून घरोघरी बाप्पासाठी नैवेद्याचे वेगवेगळे पदार्थ केले जातात. गणेशोत्सवाच्या या पावन पर्वात काहीतरी खास, शाही अन् तोंडात टाकताच विरघळणारा गोड पदार्थ बनवायचा असेल, तर 'शाही तुकडा' (Shahi Tukda) हा उत्तम पर्याय आहे. नेहमीच्या मोदक, शिरा किंवा गुलाबजामपेक्षा काहीतरी वेगळे म्हणून हा मुघलाई थाटातील पारंपरिक पदार्थ पाहुण्यांचे मन नक्की जिंकेल. साजूक तूपात शेकलेला कुरकुरीत ब्रेड, त्यावर सुगंधी साखर पाक आणि वरून ओतलेली घट्ट, केशरयुक्त रबडी यांचा हा अप्रतिम मेळ कसा साधायचा, याची सविस्तर रेसिपी खालीलप्रमाणे-