esakal | हेल्दी फूड : लॉकडाउनच्या काळातील आरोग्यावरची गुंतवणूक

बोलून बातमी शोधा

Exercise
हेल्दी फूड : लॉकडाउनच्या काळातील आरोग्यावरची गुंतवणूक
sakal_logo
By
शौमा मेनन

कोणतेही ध्येय निश्चित केल्यानंतर त्यासाठी काही प्रमाणात पैसा व गुंतवणूक ही करावीच लागते. ही गुंतवणूक छोटी आहे की की मोठी, हे तुम्हाला गाठायचे ध्येय किती मोठे अथवा छोटे आहे. यावर अवलंबून असते आपण तुमच्या आरोग्यासाठी कोणकोणत्या गुंतवणुकीची गरज असते, याबद्दलची माहिती घेऊयात. यात प्रतिकारशक्ती, फिटनेस आणि एकूणच चांगल्या आरोग्याचा समावेश होतो.

खान-पान

१) प्रोटिनचे विपुल प्रमाण असलेले अंडी, मांस, व्हे प्रोटिन सातत्याने खरेदी करावे व त्याचा मुबलक साठा घरात असावा.

२) हेल्दी फॅट्ससाठी नट्स (शेंगदाणे) व नट बटर घरात असावे.

३) सीझनल फळे तुमची प्रतिकारशक्ती वाढवतात आणि शरीरातील मायक्रोन्यूट्रियंट्सचे प्रमाणही वाढवतात. ती घरात असावीत.

४) हिरव्या पालेभाज्या विपुल प्रमाणात घरात असाव्यात. त्यांचे देठे काढून ती फ्रिजमध्ये भरून ठेवावीत सोईनुसार वापरावीत.

व्यायाम

१) दोरीवरच्या उड्या - दोरीवरच्या उड्या तुमच्या ह्रदयाच्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक आहेत. विशेषतः या लॉकडाउनच्या काळात तुम्हाला तुमच्या अपार्टमेंटच्या बाहेर पडता येत नसल्याने त्याची गरज अधिक आहे.

२) हलक्या वजनाच्या डंबेल्स - हा व्यायाम तुमच्या स्नायूंचा आकार वाढण्यासाठी व त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

३) स्ट्रेच बॅंड्स तुमच्यासाठी आवश्यक आहेत. त्यामुळे व्यायामानंतर आखडलेले स्नायू मोकळे करण्यास मदत होते.

४) घरात एखादा पाळीव प्राणी, विशेषतः कुत्रा असल्यास त्याच्याबरोबर खेळताना तुमच्या हृदयाचे स्नायू व्यवस्थित काम करत आहेत की नाही, हे पाहता येते.

ऑनलाइन प्रशिक्षण : या काळात तुमच्या आरोग्याविषयाची अधिक माहिती मिळावी ऑडिओबुक्स व पॉडकास्टचा उपयोग करा. यातून तुमचे आरोग्यविषयक शिक्षणाची गरज पूर्ण होईल. लॉकडाउनच्या या काळात व्यायामासाठी व तुमची तब्येत चांगली राखण्यासाठी या आयुधांचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. त्याचबरोबर तुमच्या मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांवर मात करण्याचा यांचा खूप चांगला उपयोग तुम्हाला होईल, यात कोणतीही शंका नाही.