Ranbhaji: रानभाजी शेवळी भाजी कशी करतात?

शेवळी ही पावसाळ्याच्या सुरुवातीला डोंगराळ आणि दुर्गम आदिवासी भागात येणारी रानभाजी आहे.
Ran Bhaji Shevali
Ran Bhaji ShevaliEsakal

शेवळी ही पावसाळ्याच्या सुरुवातीला डोंगराळ आणि दुर्गम आदिवासी भागात येणारी रानभाजी आहे. ही भाजी खाल्ल्याने पावसाळ्यात होणाऱ्या अनेक रोगांपासून आपले रक्षण होते असे आदिवासी भागात म्हटले जाते. ह्या भाजीत भरपूर जीवनसत्त्वे असतात म्हणून वर्षांतून एकदातरी ही भाजी खावी.

साहित्य:

1) आठ ते नऊ शेवळीच्या कांड्या

2) दोन मध्यम आकाराचे कांदे

3) एक वाटी सुके खोबरं किस

4) लसूण पाकळ्या

5) एक चमचा धने

6) एक चमचा जिरं

7) लवंगा

8) लाल तिखट, हळद, गरम मसाला, मीठ आवडीप्रमाणे

9) थोडी चिंच

10) चवीपुरता गूळ

11) चार चमचे तेलं

12) फोडणीसाठी जिरं, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर

Ran Bhaji Shevali
Ranbhaji: कुरडूची भाजी कशी तयार करायची ?

कृती:

सर्वप्रथम शेवळीचे वरचे पानं काढून आतली पानं आणि कांड्या वेगळ्या करून घ्या. पानं स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावी.

कांड्याचा पिवळा भाग कापून फेकून द्यावा.बाकीचा उरलेला भाग बारीक चिरून घ्या. चिरलेली पानं आणि कांड्या गरम पाण्यामध्ये 10 मिनीटे उकळवून घ्यावीत ते उकळलेलं पाणी फेकून द्यावे .

शेवळी उकळताना पाण्यात चिंच टाका म्हणजे भाजी खाजरी नाही होत.

आता किसलेलं खोबरं, कांदा, लसूण, जिरं, धने आणि लवंगा एका कढईत लालसर भाजून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

नंतर छोट्या कुकरमध्ये तेलं टाकून जिरं, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी करून घ्या आणि मिक्सरमधील वाटण आणि लाल तिखट, हळद, गरम मसाला, मीठ टाकून परतवून घ्या.आता उकळलेली भाजी टाकून परत एक मिनिटं परतवून घ्या. आपल्याला जेवढा रस्सा हवा असेल तेवढ गरम पाणी आणि गूळ टाकून शिट्टी लावून दोन शिट्ट्या करून घ्या.

कुकर थंड झालं कि झाकण काढून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून ज्वारीच्या किंवा तांदळाच्या भाकरी सोबत ही रानभाजी पोटभर खावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com