
भारतासह इतर अनेक देशांमध्ये तुरीच्या दाण्यांबरोबरच तुरीच्या पानांचा, सालीचा, मुळांचा वापर औषधे, जनावरांसाठी खाद्य तसेच इतर जीवनावश्यक वस्तू बनविण्यासाठी केला जातो.
आपण मागच्या काही लेखांपासून हिवाळ्यातील विशेष व पौष्टिक पदार्थांची माहिती घेत आहोत. हिवाळ्यात मिळणारा आणखी एक पौष्टिक व रुचकर घटक म्हणजे तुरीच्या शेंगा. तुरीच्या डाळीप्रमाणेच तुरीच्या शेंगादेखील भारतीय आहारात तितक्याच लोकप्रिय आहेत; शिवाय तुरीच्या दाण्यांपासून अनेक प्रकारचे तिखट, गोड, चटपटीत असे पदार्थ बनविले जातात. या दाण्यांचा वापर करून आपल्याकडे उसळ, घुगऱ्या, थालीपिठे, आळण, भाजी, भात, कढी, आमटी असे अनेक पदार्थ केले जातात. शिवाय, ओल्या शेंगा निखाऱ्यामध्ये भाजून त्यातील दाणे नुसतेच खाल्ले जातात. काही ठिकाणी मीठ घालून वाफवूनही दाणे खाल्ले जातात.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
भारतासह इतर अनेक देशांमध्ये तुरीच्या दाण्यांबरोबरच तुरीच्या पानांचा, सालीचा, मुळांचा वापर औषधे, जनावरांसाठी खाद्य तसेच इतर जीवनावश्यक वस्तू बनविण्यासाठी केला जातो. तुरीचे दाणे मॅग्नेशिअम, फॉस्फरस, कॅल्शिअम व पोटॅशिअमचा उत्तम स्रोत आहे. यातील फोलेट या घटकामुळे अशक्तपणा दूर होण्यास मदत होते. रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी व हृदयाचे आरोग्य नियमित राहण्यासाठीही तूर फायदेशीर आहे.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
तुरीच्या दाण्यांची कढी
साहित्य
तुरीचे ओले दाणे, ताक, मीठ, धनेपूड, साखर, कोथिंबीर.
फोडणी : तेल, जिरे, मोहरी, मिरची-आले-लसूण वाटण, कढीपत्ता.
कृती
१. दाणे वाटून घेणे.
२. फोडणी करून वाटलेले दाणे फोडणीत चांगले परतून घेणे.
३. ताकात चवीनुसार मीठ, किंचित साखर घालून घेणे व परतलेल्या दाण्यांमध्ये घालणे.
४. ढवळत उकळी आणणे.
टीप : कढी ढवळतच उकळणे आवश्यक आहे; अन्यथा कढी फुटण्याची शक्यता असते.
तुरीच्या दाण्यांचा चाट
साहित्य
तुरीचे वाफवलेले दाणे, हिरवी-पिवळी-लाल सिमला मिरची, उकडलेला बटाटा, कांदा, कोथिंबीर सर्व बारीक चिरून, चाट मसाला, मीठ, धने-जिरेपूड, काळे मीठ,
लाल तिखट, लिंबू रस, बारीक शेव (ऐच्छिक).
कृती
१. सर्व साहित्य आवडीप्रमाणे एकत्रित करणे.
२.शेव व कोथिंबीर घालून खाण्यास तयार.
टीप : आवडीच्या भाज्या व चिंचेची चटणी घालून देखील हा चाट बनविता येईल.