टोमॅटोपासून लॉंजी बनवायची आहे ? जाणून घ्या रेसिपी

अर्चना बनगे 
Friday, 5 March 2021

या टोमॅटो पासून आपण स्वादिष्ट टोमॅटो लॉंजी बनवू शकतो.

कोल्हापूर : टोमॅटो सदरातील एक अत्यावश्यक फळभाजी ठरली आहे. या टोमॅटो पासून आपण स्वादिष्ट टोमॅटो लॉंजी बनवू शकतो. त्याची पाककृती या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

साहित्य

 

 • अर्धा किलो टोमॅटो चांगले पिकलेले 
 • 100 ग्रॅम गूळ
 •  चार ते पाच लसणाच्या पाकळ्या 
 • अर्धा चमचा जिरे 
 • अर्धा चमचा अजवाइन 
 • अर्धा चमचा कलोजी 
 • अर्धा चमचा मेथी 
 • अर्धा चमचा बडीशेप 
 • अर्धा चमचा हळद
 •  एक चमचा लाल मिरची पावडर 
 • दोन चमचा सरसा चे तेल 
 • मिठ व पाणी आवश्यकते नुसार

कृती
 

टोमॅटो स्वच्छ करून त्याचे छोटे छोटे तुकडे करा. कढईमध्ये सरस तेल टाका. ते गरम होईपर्यंत गॅस वर ठेवा. सकस तेलाऐवजी तुम्ही कोणतीही खाद्यतेल वापरू शकता.
तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे, बडीशेप, कलोजी, अजवाइन, मेथी टाका. ते चांगले भाजेपर्यंत गॅस चालू ठेवा. त्यामध्ये हळद आणि लाल मिरची पावडर टाका. त्यानंतर लगेचच कापलेले टोमॅटो घाला. एक-दोन मिनिटांसाठी ते चांगले उकळून द्या.

आता यामध्ये मीठ टाका आणि दोन मिनिटे झाकून ठेवा. जर टोमॅटो मधून पाणी येत असेल तर त्यामध्ये गूळ घाला आणि ते झाकून पुन्हा एकदा उकडून घ्या. जर पाणी येत नसेल तर गुळात थोडेसे पाणी घालून ते टोमॅटो मध्ये घाला. आता गॅस सौम्य ठेवून आणि टोमेटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. यासाठी कमीत कमी पंधरा मिनिटे लागतील. वरचेवर टोमॅटो हलवत रहा. जेणेकरून टोमॅटो कढईला चिकटणार नाहीत. टोमॅटोची लॉंजी तयार होत असेल तर ते थोडे चिकट होईल. त्यानंतर गॅस बंद करा आणि कढई उतरवून ठेवा. थंड झाल्यानंतर ते तुम्ही आता तुम्ही ते सर्व्ह करु शकता. हा पदार्थ तुम्ही पाच ते सात दिवस थंड जागी ठेवू शकता अथवा फ्रीजमध्ये सुद्धा ठेवल्यास चालेल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: simple recipe of tomato launji home made simple steps in kolhapur