तुमच्या साखरेत भेसळ आहे का, कशी ओळखाल? FSSAI ने शेअर केला व्हिडिओ| Food News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुमच्या साखरेत भेसळ आहे का, कशी ओळखाल? FSSAI ने शेअर केला व्हिडिओ

तुमच्या साखरेत भेसळ आहे का, कशी ओळखाल? FSSAI ने शेअर केला व्हिडिओ

sakal_logo
By
टीम ई सकाळ

आपण एखादी गोष्ट खरेदी करताना आपल्याला सर्वोत्कृष्‍ट वाटणारे ब्रँड निवडत असतो .पण कधी कधी या उत्पादनांमध्ये किंवा खाद्यउत्पादनांमध्ये भेसळ असू शकते, ज्यामुळे आरोग्याशी संबंधित विविध समस्या उद्भवू शकतात आणि कर्करोगजन्य परिणाम देखील होऊ शकतात.

जर तुम्ही नुकतीच साखर खरेदी केली असेल आणि तिच्यात भेसळ झाली आहे का हे तुम्हाला शोधायचं असेल, तर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) सुचवलेली एक सोपी युक्ती आपण वापरू शकता. या वैधानिक मंडळाने अलीकडेच साखर क्रिस्टल्स आणि अगदी कृत्रिम स्वीटनरमधील युरिया भेसळ शोधण्यासाठी एक युक्ती सांगितली आहे.

हेही वाचा: जगातलं असं आयलँड जिथं राहतात फक्त महिला!

शरीरात युरियाचे वाढलेले प्रमाण अनेक प्रकारे हानिकारक ठरू शकते. द अॅटलस ऑफ सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे युरियाचा अनेक अवयवांवर विपरित परिणाम होतो. युरियाच्या उच्च पातळीमुळे आतड्यांतील जीवाणूंमध्ये बदल होतात, आतड्यांसंबंधी भिंतींमध्ये जळजळ होते, ज्यामुळे पेशींचा मृत्यू देखील होतो.

हेही वाचा: World Kindness Day 2021; दुसऱ्याशी प्रचंड दयेनं अन् प्रेमानं कसं वागाल?

भेसळ कशी शोधायची?

-थोडी साखर घ्या आणि त्यात पाणी घाला.

-साखर पूर्णपणे विरघळू द्या.

कसं कळणार?

-साखर विरघळलेल्या पाण्याला अमोनियाचा वास येत नसल्यास ती भेसळविरहित असते.

- साखर विरघळल्यावर जर तुम्हाला अमोनियाचा वास येत असेल तर ती भेसळयुक्त आहे.

हेही वाचा: World Diabetes Day 2021 : ब्लड प्रेशरची औषध मधुमेहासाठी फायदेशीर; संशोधनाचा निष्कर्ष

अमोनियाचा वास कसा येतो?

अमोनिया एक रंगहीन वायू असून नायट्रोजन आणि हायड्रोजन यांचे संयुग आहे. अमोनियाला तीव्र गंध असतो, ज्याचा लघवी किंवा घामासारखा वास येतो. medicalnewstoday.com नुसार हे गॅस कंपाऊंड पाणी, माती आणि हवेमध्ये नैसर्गिकरित्या आढळतो आणि वनस्पती, प्राणी आणि मानवी शरीरात देखील आढळतो.

यापूर्वी, FSSAI ने काळ्या मिरीमधील भेसळ शोधण्याची एक युक्ती देखील शेअर केली होती. ते तपासण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या अंगठ्याने काळी मिरी क्रश करायची आहे. जर ती सहजपणे तुटली तर तिच्यात ब्लॅकबेरीची भेसळ केली असल्याचे समजावे, ज्यामुळे ती वापरासाठी असुरक्षित ठरते.

loading image
go to top