

Winter Special Khus Khus Halwa
sakal
Khus Khus Halwa Benefits: थंडीच्या हुडहुडीत गरमागरम अस्सल देशी तुपातला हलवा कोणाला आवडत नाही? हिवाळा सुरु झाला की प्रत्येकाच्या घरात गाजर, दुधी नाहीतर मूगडाळीच्या हलव्याचा बेत पक्का असतोच. पण हिवाळ्यात अजून एका पदार्थाचा हलवा फक्त पौष्टिक नाही चविष्टही लागतो. तो म्हणजे खसखसचा हलवा.
आरोग्यदायी फॅट्स, प्रथिने आणि महत्त्वपूर्ण खनिजांनी समृद्ध असलेली खसखस हिवाळी आहारासाठी उत्तम मानली जाते. थंडीमुळे होणाऱ्या त्वचेच्या कोरडेपणापासून संरक्षण करण्यासाठी सुद्धा खसखस मदत करते.