

Morning Breakfast Recipe:
Sakal
सकाळचा नाश्ता हेल्दी आणि पटकन तयार होणारा असावा असं प्रत्येकालाच वाटतं. त्यातही हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असेल तर पौष्टिकतेलाही भर पडते. अशाच हेल्दी पर्यायांपैकी एक आहे पालक ढोकळा आहे. पारंपरिक ढोकळ्याला हा हिरवा ट्विस्ट देऊन त्याला अधिक स्वादिष्ट, मऊ आणि फ्लफी बनवता येतं. पालकातील लोह, कॅल्शियम आणि फायबर शरीराला आवश्यक ऊर्जा देतात, तर रवा आणि दही यामुळे ढोकळ्याला उत्तम टेक्स्चर मिळतं. पालक ढोकळा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.