
sprouted oats dosa: पावसाळ्याच्या या थंड आणि दमट हवामानात सकाळचा नाश्ता पौष्टिक आणि चविष्ट असावा, ज्यामुळे दिवसाची सुरुवात ऊर्जेने होईल. अशा वेळी स्प्राउट ओट्स डोसा हा एक उत्तम पर्याय आहे, जो केवळ चवदारच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. स्प्राउट्स आणि ओट्स यांचा समावेश असलेली ही रेसिपी प्रथिने, फायबर आणि आवश्यक पोषक तत्त्वांनी परिपूर्ण आहे. पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी हा डोसा उत्तम आहे. कमी वेळात तयार होणारा हा पौष्टिक नाश्ता मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल. चला तर मग यंदा पावसाळ्यात सकाळच्या नाश्त्यासाठी पौष्टिक स्प्राउट ओट्स डोसा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.