Chia-Mango Smoothie: सकाळच्या नाश्त्यासाठी फक्त ५ मिनिटांत तयार करा पौष्टिक आणि थंडगार 'चिया मँगो स्मूदी'

Quick and Healthy Mango Chia Smoothie for Breakfast: फक्त ५ मिनिटांत तयार होणारी चविष्ट आणि आरोग्यदायी चिया मँगो स्मूदी, सकाळच्या नाश्त्यासाठी परिपूर्ण असलेली रेसिपी लगेच लिहून घ्या.
Quick And Healthy Chia Mango Smoothie For Breakfast
Chia Mango Smoothiesakal
Updated on

Refreshing And Healthy Chia Mango Smoothie Recipe: उन्हाळाच्या दिवसात जास्त भूक लागत नाही. पण दिवसभर काम करण्यासाठी लागणारी ऊर्जा टिकून राहावी म्हणून सकाळचा नाश्ता फार महत्त्वाचा असतो. अशातच काहीतरी हलकं-फुलकं पण पोटभरीचं असलं की नाश्ताही होतो आणि शरीराला आवश्यक ऊर्जाही मिळते. त्यासाठीच आम्ही पुढे चविष्ट आणि पौष्टिक चिया मँगो स्मूदीची रेसिपी दिली आहे ती लगेच लिहून घ्या.

साहित्य

१ पिकलेला आंबा (साल काढून चिरलेला)

१ कप दूध (अथवा बदाम दूध / नारळाचे दूध)

१ मोठा चमचा चिया बिया

१ चमचा मध (ऐच्छिक)

४–५ बर्फाचे तुकडे

Quick And Healthy Chia Mango Smoothie For Breakfast
Summer Special Mango Lassi Recipe: उन्हाळ्याच्या हिटला करा बीट; घरीच बनवा झटपट 'थंडगार मँगो लस्सी'

कृती

- आधी चिया बिया अर्धा तास थोड्या दुधात भिजत ठेवा, जेणेकरून त्या फुगतील.

- मिक्सरमध्ये चिरलेला आंबा, उरलेले दूध, मध आणि बर्फ टाका.

- सर्व साहित्य गुळगुळीत होईपर्यंत मिक्स करा.

- त्यात फुगलेल्या चिया बिया मिसळा आणि हलक्या हाताने ढवळा.

- थंडगार स्मूदी ग्लासमध्ये सर्व्ह करा. वरून थोड्या चिया बिया किंवा मँगो तुकडे घालून सजवा.

टीप

- अधिक प्रोटिनसाठी या स्मूदीमध्ये बदाम, अक्रोड किंवा प्रोटीन पावडरही घालू शकता.

- साखर नको असल्यास गोडसर पिकलेला आंबा निवडा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com