
beetroot cutlets,
Sakal
रविवारी सकाळी खास नाश्त्यासाठी कुरकुरीत बीटचे कटलेट बनवा.
ही सोपी रेसिपी आरोग्यदायी आहे.
हे कटलेट बाहेरून कुरकुरीत आणि आतू मऊ असतात. पुदीना चटणीसोबत सर्व्ह करा.
How to make crispy beetroot cutlets for Sunday breakfast: रविवारची सकाळ खास आणि चविष्ट बनवण्यासाठी तुमच्या ब्रेकफास्टमध्ये समावेश करा. कुरकुरीत बीटचे कटलेट ही सोपी आणि झटपट रेसिपी तुमच्या कुटुंबाला नक्कीच आवडेल. बीट जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे, त्यात व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. हे कटलेट केवळ चवदारच नाहीत तर पचन सुधारण्यास आणि रक्तदाब नियंत्रित करण्यासही मदत करतात. कमी वेळात तयार होणारी ही रेसिपी व्यस्त रविवारच्या सकाळी बनवण्यासाठी उत्तम आहे. बटाटे, मसाले आणि बीट यांच्या मिश्रणाने तयार केलेले हे कटलेट बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असतात. यासोबत पुदीना चटणी किंवा टोमॅटो सॉस सर्व्ह करा. ही रेसिपी खासकरून मुलांना नक्की आवडेल. चला तर मग जाणून घेऊया कुरकुरीत बीटचे कटलेट बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.