Sunday special: पारंपरिक पद्धतीने काशीफळाचे घारगे कसे तयार करावे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kashifal gharge

Sunday special: पारंपरिक पद्धतीने काशीफळाचे घारगे कसे तयार करावे?

काशीफळामध्ये व्हिटामिन ए, इ, सी सोबतच आयर्नचा मुबलक साठा असतो. त्यामुळे काशीफळ खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.काशीफळामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए असते. व्हिटॅमिन ए मुळे तुमच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. डोळ्यातील रॅटीना सुरक्षित राहण्यासाठी आणि दृष्टी सुधारण्यासाठी शरीराला व्हिटॅमिन ए गरजेचं असतं. अनेक जण वाढत्या वजनाने त्रस्त असतात. अशा व्यक्तींनी काशीफळाची भाजी खावी. काशीफळात कमी कॅलरीज असतात. तसंच त्यात मोठ्या प्रमाणावर फायबरचं प्रमाण असतं त्यामुळे शरीरातील फॅट्स कमी होतात आणि भूकेवर नियंत्रण राहण्यास मदत होते. 100 ग्रॅम काशीफळातून 26 कॅलरीज मिळतात. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे अशांनी आहारात आवर्जून भोपळ्याचा समावेश करावा.

चला तर मग बघूया पारंपारिक पद्धतीने काशीफळाचे घारगे कसे तयार करावे?

हेही वाचा: Recipe: स्वादिष्ट दम आलू भाजी कशी तयार करावी?

साहित्य:

काशीफळाचा किस - दोन वाट्या

गूळ - दिड वाटी

तांदळाचे पीठ - अर्धी वाटी

गव्हाचे पीठ - अंदाजे

मीठ - चीमूटभर

तूप - दोन चमचे

तेल -

कृती:

सुरुवातीला काशीफळ बारीक किसून घ्यायचा. नंतर कढईत दोन चमचे तूप घालून त्यामध्ये किसलेले काशीफळ घालून तो चांगला परतून घ्यावे. काशीफळ थोडं शिजत आला की त्यामध्ये गूळ घालून मिश्रण चांगले हलवत राहायावे. गुळाचा पाक व्हायला सुरुवात झाली की काशीफळ आणि गूळ एकजीव चांगला शिजतो.

शिजलेलं हे मिश्रण थोडं थंड होऊ द्याव.

नंतर या मिश्रणात तांदळाचे पीठ, चवीला मीठ आणि त्यात बसेल तितकेच गव्हाचे पीठ घालायचे. हे पीठ मळताना तेल, पाणी या कशाचाच वापर न करता चांगले घट्ट पीठ मळून घ्यावे. पीठ मळून झाल्यावर 15 मिनीटे ते बाजूला ठेवावे. गॅसवर लोखंडी कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून ते मध्यम आचेवर गरम होऊ द्यायचे.

नंतर भिजवलेल्या पिठाचे घारगे तेल न लावता थोडे जाडसर लाटून घेऊन त्या तेलात मध्यम आचेवर लालसर तळून घ्यावे. अशा रितीने काशीफळाचे घारगे तयार झाले आहे हे घारगे तुम्ही तूप घालून खाऊ शकता.

Web Title: Sunday Special How To Prepare Kashifal Gharge In Traditional Way

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..