

Sunday Special Recipe:
Sakal
Sunday Special Recipe: रविवार म्हणजे सुट्टी, निवांत वेळ आणि घरच्यांसोबत स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेणे होय. रोजच्या धावपळीत साधं जेवण होत असलं तरी रविवार आला की काहीतरी खास बनवावंसं वाटतं. अशा वेळी झटपट, चवदार आणि सगळ्यांना आवडणारी रेसिपी म्हणजे घरगुती पुलाव होय. अगदी कमी साहित्यात तुम्ही कमी वेळेत हा पदार्थ तयार करु शकता. भाजी, मसाले आणि सुगंधी तांदूळ यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे पुलाव. विशेष म्हणजे हा पदार्थ कोणीही सहज बनवू शकतो. सुट्टीच्या दिवशी फार वेळ स्वयंपाकघरात घालवायचा नसेल, पण तरीही जेवण खास हवं असेल, तर ही पुलाव रेसिपी उत्तम पर्याय ठरते. चला तर मग घरच्या घरी पुलाव बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.