Sunday Special रविवार करा साजरा..झकास अंडाकरी खाऊन

अंड Egg हा खरं तर सगळ्यात कमी वेळेत होणारा एक हेल्दी पर्याय आहे. तसचं अगदी कॉलेजमधील बॅचलर असो किंवा नवीन स्वयंपाक Cooking शिकणारे असो कुणालाही सहज जमेल अशी ही एक रेसिपी Recipe आहे
अंडा करी
अंडा करीEsakal

अनेकदा आपल्याया खास करून घरातील गृहिणींना जेवणासाठी नेमकं काय करावं असा प्रश्न पडतो. खास करून रविवार Sunday म्हंटलं तर नॉनव्हेजचा Nonveg वार पण अनेकदा बाहेर जाऊन चिकन. मटण किंवा मासे आणणं अनेकांना शक्य होत नाही. अशा वेळी काय करावं असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर अंडा करी Egg Curry हा एक बेस्ट पर्याय आहे. Sunday Special Recipe how to make tasty eggs curry

अंड Egg हा खरं तर सगळ्यात कमी वेळेत होणारा एक हेल्दी पर्याय आहे. तसचं अगदी कॉलेजमधील बॅचलर असो किंवा नवीन स्वयंपाक Cooking शिकणारे असो कुणालाही सहज जमेल अशी ही एक रेसिपी Recipe आहे. तेव्हा आज आम्ही तुम्हाला झटपट होणारी अंडा करीची रेसिपी शेअर करत आहोत. 

अंडा करीसाठी लागणारं साहित्य

४ उकडलेली अंडी, १ मोठा कांदा बारीक चिरलेला, १ मोठा टोमॅटो चिरलेला, १ चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद. १ चमचा आलं लसूण पेस्ट, १ चमचा गरम मसाला, अर्धी वाटी किसलेलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर

अंडा करीची कृती 

  • अंडा करी बनवण्यासाठी सर्व प्रथम अंडी उकडून  घ्यावीत. त्यानंतर उकडलेल्या अंड्याची सालं काढावी. अंड्याला सुरीने हलते काप द्यावे. 

  • एका पॅनमध्ये थोडं तेल घेऊन त्यात पाव चमचा हळद आणि पाव चमचा लाल मिरची पावडर टाकून त्यात उकडलेली अंडी टाकून परतून घ्यावी.  १ मिनिटं अंडी परतून बाजूला काढून ठेवावी. 

  • एका कढईमध्ये २ चमचे तेल तापल्यावर त्यात आलं लसूण पेस्ट टाकावी. त्यानंतर यात बारीक चिरलेला कांदा लाल होईपर्यंच परतून घ्यावा. 

  • कांदा परतल्यानंतर त्यात चिरलेला टोमॅटो टाकावा. 

  • त्यानंतर यात लाल मसाला, हळद आणि गरम मसाला टाकून चांगलं परतून घ्यावं. ३-४ मिनिटांसाठी झाकण ठेवावं. 

    हे देखिल वाचा-

अंडा करी
Egg Biryani Recipe : अंडा बिर्याणी बनवण्याची याहून सोप्पी पद्धत तुम्हाला कोणीच सांगितली नसेल?
  • तोवर किसलेलं खोबरं मिक्सरला बारीक करून घ्यावं

  • आता फोडणीमध्ये किसलेलं खोबरं टाकून थोडं परतावं. 

  • यात मसाल्यात परतलेली अंडी टाकावी. मसाल्यात अंडी चांगली परतल्यावर त्यात १ ते दीड ग्लास पाणी टाकावं. 

  • यानंतर अंडा करी ५-७ मिनिटांसाठी मध्यम आचेवर उकळू द्यावं. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून गॅस बंद करावा. 

अशा प्रकारे तयार झालेली चमचमीत अंडा करी तुम्ही गरमा गरम भाकरी किंवा वाफाळलेल्या भातासोबत वाढू शकता. अगदी कमी वेळात तयार होणारी अंडा करी तुमच्या जेवणाची मजा नक्कीच वाढवेल. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com