esakal | बिना लसणाचा टँगी टोमॅटो साॅस बनवा घरी, ही आहे रेसिपी
sakal

बोलून बातमी शोधा

बिना लसणाचा टँगी टोमॅटो साॅस बनवा घरी, ही आहे रेसिपी

बिना लसणाचा टँगी टोमॅटो साॅस बनवा घरी, ही आहे रेसिपी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद - फ्रेन्च फ्राईज असो, पोटॅटो चिप्स किंवा व्हेज बर्गर, पिझ्झा याबरोबर टोमॅटो साॅस असल्याशिवाय खाल्ल्यासारखे वाटत नाही. मुलांना तर टोमॅटो साॅसशिवाय कोणतेही स्नॅक्स चांगले लागत नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला आज बिना लसणाचे टँगी टोमॅटो साॅस (Tangy Tomato Sauce Recipe In Marathi) घरी कसे बनवायचे याविषयी सांगणार आहोत. यात कोणतेही रासायनिक घटक टाकले जात नाहीत. त्यामुळे बच्चेकंपनीबरोबर मोठ्यांनाही टँगी टोमॅटो साॅस आवडेल. तर चला रेसिपी जाणून घेऊया...

साहित्य

- टोमॅटो - १२

- पाणी - १ कप

- लवंग - ६

- दालचिनी - १ तुकडा

- काळी मिरची - १ छोटा चमचा

- मीठ - १ छोटा चमचा

- साखर - २ चमचे

- व्हिनेगार - १ छोटा चमचा

कृती

- सर्वप्रथम टोमॅटो चांगल्या प्रकारे धुवून घेऊन त्याचे बारीक तुकडे करुन घ्या.

- मग पॅनमध्ये पाणी घेऊन त्यात सुके मसाले आणि टोमॅटोचे तुकडे टाका.

- गॅसवर थोडा वेळ शिजवल्यानंतर गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून द्या.

- आता सगळ मिक्सरमध्ये एकदम बारीक करुन घ्या. नंतर ते गाळून उकळा

- त्यात मीठ आणि साखर टाका. त्यात व्हिनेगार मिक्स करा.

- गॅस बंद करा. शिजलेली टँगी आणि बिना लसणाची टोमॅटो साॅस तयार आहे.

loading image
go to top