Zunka Recipe : असा बनवा गरमा-गरम झणझणीत झुणका की बोटं चाखत रहाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Zunka Recipe

Zunka Recipe : असा बनवा गरमा-गरम झणझणीत झुणका की बोटं चाखत रहाल

हिवाळ्यात भाकरी आणि झुणका खायची प्रचंड इच्छा होते आणि झुणका भाकर हा हेल्दी आहार म्हणूनही ओळखला जातो. आज आपण टेस्टी झुणका कसा बनवायचा जाणून घेणार आहोत.

साहित्य:

 • दोन कांदे

 • चार टेबल स्पून डाळीचे पीठ

 • चवीप्रमाणे तिखट

 • मीठ

 • तेल

 • मोहरी

 • हिंग

 • हळद

 • कोथिंबीर

हेही वाचा: Aamti Recipe : टेस्टी कडधान्याची आमटी खा अन् हेल्दी रहा

कृती :

 • कांदे चिरून घ्यावेत.

 • नेहमीपेक्षा जरा जास्त तेलाची मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी.

 • त्यावर कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घ्यावा.

 • डाळीच्या पिठात तिखट मीठ घालून पाण्याने ते कालवावे.

हेही वाचा: Chaha Poli : चहा-पोळी खा अन् वजन नियंत्रणात ठेवा

 • आवडत असल्यास त्यात लसूण ठेचून घालावा.

 • हे मिश्रण परतलेल्या कांद्यावर ओतून चांगले शिजवावे.

 • पिठले किती घट्ट त्यावर पाण्याचे प्रमाण ठरवावे.

 • हे पिठले म्हणजेच झुणका. हे लोखंडाच्या कढईत केल्यास जास्त खमंग होते.