Gulab Jamun Recipe: तोंडातच विरघळतील हे खव्याचे गुलाब जामुन, ही सोपी रेसिपी ट्राय करा

हटके खव्याचे गुलाब जामुन कसे करायचे? जाणून घ्या रेसिपी
Gulab Jamun Recipe
Gulab Jamun Recipesakal

दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. त्यात गोडधोड, एकापेक्षा एक भारी मेजवानी असते. आज आम्ही तुम्हाला हटके खव्याचे गुलाब जामुन कसे करायचे, या विषयी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया खवा गुलाब जामुन रेसिपी.

साहित्य

  • ५०० ग्रॅम गुलाब जामुनचा खवा

  • ५०० ग्रॅम साखर

  • ७-८ वेलदोडे

  • १०० ग्रॅम कॉर्नफ्लोअर

  • थोडा रोझ इसेन्स

  • १ चिमूट खायचा सोडा

Gulab Jamun Recipe
Dahi Chutney Recipe: जेवणाचा स्वाद वाढवायंचा? अशी करा टेस्टी दह्याची चटणी

कृती

  • खवा हाताने मोडून घ्यावा. पुरणयंत्रातून बारीक जाळी लावून काढून घ्यावा. नंतर त्यात वेलचीपूड व कॉनफ्लोअर घालावे.

  • १/२ चमचा खायचा सोडा पाण्यात मिसळून घालावा. सर्व मिश्रण चांगले एकत्र करावे. उगीच मळू नये.

  • नंतर त्याचे ५० लहान लहान गोळे करून अगदी मंदाग्रीवर तळावेत. तळताना गुलाब जामुनवर तूप उडवावे. नंतर काढून, तूप निथळून, पाकात टाकावे.

  • गुलाब जामुन तळण्यापूर्वी पाक करावा. साखरेत मोठे २ कप पाणी घालून एकतारी पाक कराबा. पाकात रोझ इसेन्स घालावा.

Gulab Jamun Recipe
Diwali Recipe: घरच्या घरी कुरकुरीत खमंग मसाला शेव कसे तयार करायचे?
  • गुलाब जामुन पाकात टाकताना पाक गरम असावा. दुसरे तळून झाले, की पाहिले पाकातून काढून स्टीलच्या ओव्हल भांड्यात किंवा उथळ डब्यात ठेवावेत.

  • सर्व्ह करताना गुलाब जामुनच्या वाटीत थोड्या गावठी गुलाबाच्या पाकळ्या टाकाव्या. म्हणजे फार शोभिवंत दिसते. गुलाब जामुनचा खवा गाईच्या दुधाचा असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com