हिवाळ्यात या ६ फळांचा आहारात समावेश कराच...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 12 January 2020

या ६ फळांचा आहारात समावेश केला तर नक्कीच फायदा होईल. त्यामुळे ही हंगामी फळे फ्रूट सॅलडमध्ये टाकून खाल्ल्याने फायदा होईल.

पुणे : त्या-त्या ऋतूमध्ये येणारी फळे आरोग्यासाठी लाभदायक असतात. त्यामुळे हिवाळ्यात येणारे फळ खाल्ल्याने अनेक आजारांपासून बचाव केला जाऊ शकतो. या ६ फळांचा आहारात समावेश केला तर नक्कीच फायदा होईल. त्यामुळे ही हंगामी फळे फ्रूट सॅलडमध्ये टाकून खाल्ल्याने फायदा होईल.

1. डाळिंब

डाळिंबामध्ये भरपूर अँटिऑक्सिडेंट्स असते त्यामुळे कँसर, हार्ट अटॅक आणि डिप्रेशन सारख्या अाजारात दिलासा मिळतो. गर्भवती महिलांसाठी डाळिंब खाणे फायदेशीर असते, हे फळ अशक्तपणा दूर करण्यास मदत करते, डाळिंब त्वचेसंबंधी समस्या जसे पिंपल्स आणि सुरकुत्या दूर करण्यास मदत करते, तसेच पोटाच्या समस्या दूर होतात. वंध्यत्व सारख्या समस्यादेखील दूर होतात.

2. पेरू

यामध्ये फोलेट, फायबर्स, विटामिन्स आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे हिवाळयात होणारी पोटासंबंधी समस्या दूर करण्यास मदत होते, पेरू खाल्ल्याने शुगर बरोबरच सीरम टोटल कोलेस्टेरॉल ट्रायग्लिसेराइड्स आणि एलडीएल कोलेस्टेरॉल नियंत्रित राहाते.

3. सीताफळ

सीताफळामध्ये असलेले आयर्नामुळे अॅनिमियाचा त्रास कमी होतो. गरोदर महिलांनी सीताफळ खाल्ल्याने फायदा मिळतो, गरोदर महिलांनी रोज सीताफळ खाल्ल्याने गर्भाचा विकास होतो आणि हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते, यामध्ये मॅग्नेशियम, सोडियम आणि पोटॅशियम असते, त्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होऊन हार्टअटॅक आणि स्ट्रोकपासून बचाव होतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

4. चिकू

यामध्ये असलेल्या अंतर्भूत गुणामुळे अनेक आजारापासून आपला बचाव केला जातो, या फळामुळे बद्धकोष्टता, अतिसार, अशक्तपणा आणि हृदय रोगापासून बचाव होतो. याशिवाय यूरेन इन्फेक्शन दूर होते. यामध्ये ग्लुकोजचे प्रमाण अधिक असल्यामुळे चिकू शेक एनर्जी ड्रिंक म्हणून पिले जाऊ शकते.

5. संत्री

संत्र्यामध्ये विटॅमिन्स असते जे त्वचेवरील सुरकुत्यापासून बचाव करते. त्वचेच्या कोरडेपणा पासून बचाव होतो. संत्री खाल्ल्याने वयाचा वाढता प्रभाव कमी करता येतो. यामध्ये असलेल्या पोटॅशियममुळे उच्च रक्तदाब, हार्ट अटॅक आणि स्ट्रोक सारखे आजार कमी करण्यास मदत मिळते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

6. पपई

पपई खाल्याने शरीरातील उष्णता वाढते, मासिक पाळीच्या समस्या दूर हाेतात, पपईमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते जे बद्धकोष्ठता किंवा अपचन सारख्या पोटाच्या समस्या दूर करण्यास मदत करते. कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास उपयोगी आहे, पपई नियमित खाल्ल्याने शरीरात वाढलेले कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवली जाऊ शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: These 6 seasonal fruits will keep you from winter illnesses