Father's Day Special: फादर्स डे ला बाबांसाठी घरच्या घरी बनवा खास 'क्रिमी बटरस्कॉच मूस', लगेच लिहून घ्या ही सोपी रेसिपी

Easy Father's Day Recipes to Make at Home: फादर्स डे निमित्त बाबांसाठी बनवा घरच्या घरी गोडसर आणि क्रिमी बटरस्कॉच मूस – ही सोपी रेसिपी आजच करून बघा!
Father's Day Special Creamy Butterscotch Mousse
Father's Day Special Creamy Butterscotch Moussesakal
Updated on

Marathi Dessert Recipe for Father’s Day Celebration: दरवर्षी जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीचा हा दिवस. या दिवशी तुमच्या बाबांसाठी काहीतरी खास आणि गोड बनवायचं ठरवलं आहे का? तर मग बटरस्कॉच मूस ही गोडसर डेझर्ट रेसिपी तुमच्यासाठी एक परफेक्ट पर्याय ठरू शकते. घरच्या घरी अगदी सहज उपलब्ध साहित्य वापरून तुम्ही ही गोड डिश तयार करू शकता. चला तर मग पाहूया ही खास रेसिपी.

साहित्य

  • ½ कप ब्राउन शुगर

  • 3 टेबलस्पून अनसाल्टेड बटर

  • ½ कप हेवी क्रीम

  • ½ टीस्पून मीठ

  • 1 टीस्पून व्हॅनिला एसेंस

  • 1 कप थंड हेवी क्रीम

  • 1 टीस्पून जिलेटिन

  • 1 टेबलस्पून थंड पाणी

बटरस्कॉच सॉस बनवण्याची पद्धत:

  • एका पॅनमध्ये बटर आणि ब्राउन शुगर मध्यम आचेवर वितळवा.

  • २-३ मिनिटे ढवळत शुगर पूर्ण वितळेपर्यंत शिजवा.

  • नंतर त्यात हेवी क्रीम आणि मीठ घालून पुन्हा २-३ मिनिटे शिजवा.

  • गॅस बंद करून त्यात व्हॅनिला एसेंस घालून गार होऊ द्या.

मूस तयार करण्याची पद्धत:

  • जिलेटिन थंड पाण्यात ५ मिनिटे भिजवा आणि नंतर गरम करून वितळवा.

  • हे जिलेटिन तयार बटरस्कॉच सॉस मध्ये घालून नीट मिसळा.

  • थंड क्रीमला मिक्सरने फेटा जोपर्यंत हार्ड पीक्स तयार होतात.

  • तयार सॉस हळूहळू या फेटलेल्या क्रीममध्ये मिसळा, संथपणे ढवळा.

  • हे मिश्रण ग्लास किंवा बाउलमध्ये ओता आणि किमान २ तास फ्रीजमध्ये ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com