घरच्या घरी नैसर्गिक पध्दतीने पिकवा टेस्टी केळी! आरोग्यासही उत्तम

banana
bananaesakal

आजकाल बाजारात नैसर्गिक आणि केमिकल टाकून पिकवलेली केळी ओळखणं म्हणजे फारच कठिण..बाजारात उपलब्ध असलेल्या तसेच केमिकलने पिकविलेल्या केळी हळूहळू मनुष्याला आजारी पडतात. अशा परिस्थितीत कच्ची केळी घरीच पिकवून खाणे आवश्यक आहे. कच्च्या केळीला सहज नैसर्गिक पद्धतीने देखील पिकवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही कच्ची केळी घरी एक ते दोन दिवसात सहजपणे पिकवू शकता. चला तर मग या टिप्सबद्दल जाणून घेऊया. (tips-how-to-ripen-raw-bananas-at-home-marathi-news)

गवताची घ्या मदत

तुम्ही सहजरित्या एक ते दोन दिवसांत कच्ची केळी शिजवू शकता. यासाठी गार्डनमध्ये असलेले गवत कापून उन्हात ठेवा. ते सुकल्यानंतर ते एका कागदावर ठेवून द्या. त्यात कच्ची केळी ठेवून थंड ठिकाणी ठेवून द्या. दोन ते तीन दिवसांत कच्ची केळी पिकून तयार होईल

पेपर बॅग

जर तुम्हाला केळी लवकर पिकवायची असेल तर पेपर बॅगचाही वापरु शकता. केळीत एथेन गॅस असते. तिच्या मदतीने केळी पेपरमध्ये ठेवल्याने ती पिकतात. यासाठी सर्वप्रथम केळीला एका पेपरमध्ये चांगल्या प्रकारे गुंडाळून घ्या. आता ती पेपर बॅगमध्ये टाकून किचनमध्ये ठेवून द्या. एक ते दोन दिवसांत नैसर्गिक पद्धतीने केळी पिकून तयार होतात.

तांदळाचा डबा- एक सोपी पध्दत

केळीला नैसर्गिक पद्धतीने पिकवण्यासाठी सर्वात सोपी पद्धत म्हणजे तांदूळ. यासाठी केळीचा वरचा भाग प्लास्टिकने गुंडाळा. त्यानंतर पेपर बॅग किंवा न्यूज पेपरमध्ये ठेवा आणि तांदळात ती ठेवून द्या. साधारण एक ते दोन दिवसांत कच्ची केळी पिकवून तयार होते.

मातीचा वापर करा

आजही दूरच्या आणि ग्रामीण भागात कच्ची केळी मातीच्या आत ठेवून ती पिकवली जाते. त्यासाठी सर्वप्रथम केळीला कोणत्याही कपड्यात किंवा पेपरमध्ये गुंडाळून मातीत जवळजवळ २ ते ३ तीन खोल दाबली जातात आणि वरुन केळीला मातीने झाकले जाते. याने दोन दिवसांत केली सहज पिकते. मातीत पिकवलेले केळी स्वादिष्ठ आणि आरोग्यही असते.

banana
चहा एवढाच त्याचा इतिहाससुद्धा आहे टेस्टी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com