
Tiranga Paratha Recipe: प्रजासत्ताक दिनानिमित्ताने बनवा खास पौष्टिक असा तिरंगा पराठा...
Republic Day 26 January : भारत आज 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान लागू झाले होते. भारताचा स्वातंत्र्यदिन ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्याचा उत्सव म्हणून तर प्रजासत्ताक दिन संविधानाच्या अंमलबजावणीचा उत्सव म्हणून आपण साजरा करतो. हिवाळ्यात बहुतेक घरांमध्ये पराठ्याला प्राधान्य दिले जाते. अशा परिस्थितीत तुम्ही तिरंगा पराठा रेसिपीने हा प्रजासत्ताक दिन खास बनवू शकता. आजच्या लेखात आपण तिरंगा पराठा कसा तयार करायची याची रेसिपी काय आहे ते जाणून घेऊया.
हेही वाचा: Winter Recipe: हिवाळ्यात ओव्याचे पौष्टिक लाडू कसे तयार करायचे?
साहित्य
● पराठ्याच्या केशरी भागासाठी
अर्धी वाटी गव्हाचे पीठ
गाजर प्युरी
चवीनुसार मीठ
● पराठ्याच्या हिरव्या भागासाठी
अर्धी वाटी गव्हाचे पीठ
मटार प्युरी
चवी नुसार मीठ
● पराठ्याच्या पांढऱ्या भागासाठी
अर्धी वाटी गव्हाचे पीठ
चवी नुसार मीठ
हेही वाचा: Winter Recipe: हिवाळ्यात आरोग्यासाठी पौष्टिक असणारी दुधी भोपळ्याची खिर कशी तयार करायची?
कृती
तिरंगा पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम मिक्सरमध्ये गाजर आणि मटारची प्युरी वेगवेगळी तयार करून घ्यावी. गाजर आणि मटारची प्युरी तयार करुन बाजूला ठेवा. यानंतर एका भांड्यात पीठामध्ये गाजर प्युरी आणि मीठ एकत्र करून मळून घ्यावे. दुसऱ्या भांड्यात मटारची प्युरी आणि मीठ पिठात मिसळून वेगवेगळे मळून घ्यावे. त्यानंतर त्याच भांड्यात मीठ घालून साधे पीठ मळून घ्यावे. आता तुमच्याकडे तिन्ही रंगांचे वेगवेगळे पीठ आहेत. आता तिन्ही पिठांचा एक छोटासा भाग घ्या आणि ते एकमेकांना सारखे दाबा. पीठ तिरंग्यासारखे कापून घ्यावे.नंतर गोळे पराठ्याच्या आकारात लाटून घ्यावे. गरम तव्यावर तेल लावून पराठा बेक करा. तुमचा चविष्ट तिरंगा पराठा तयार आहे. गरमागरम पराठा चटणी, लोणचे किंवा दहीसोबत सर्व्ह करावा.