
पौष्टिक गरमा गरम मिक्स पिठाचे शिंगोळे कसे बनवावे; वाचा रेसिपी
बऱ्याच वेळा काही चटपटीत खायची चव येते. अशावेळी कोणता पदार्थ बनवावा असा प्रश्न अनेक गृहीणींना पडतो. मात्र झटपट तयार होणाऱ्या आणि पौष्टिक पदार्थांची नेमकी यादी अशावेळी लक्षात येत नाही. यावेळी तुम्ही हे उकडीचे शेंगुळे बनवू शकता. काही ठिकाणी या शेंगुळ्याचा आमटीसाठी वापर होतो. म्हणजेचे यात सार घालून ती खाल्ली जाते. मात्र ही रेसिपी त्यापेक्षा वेगळी आणि सोपी काही वेळात तयार होणारी आहे. यासाठी बाजारातून वेगळे साहित्या आणण्याची गरजही भासत नाही. अगदी घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून ही पौष्टिक रेसिपी बनवली जाते. खास करुन सायंकाळी चारच्या नाश्तासाठी मुलं याची डिमांड करु शकता. अशावेळी तुम्ही ही झटपट तयार होणारी रेसिपी बनवू शकता.
हेही वाचा: नियमित बिअर प्यायल्याने शरीरावर होतात चार परिणाम, जाणून घ्या
साहित्य -
गहू, ज्वारी, तांदूळ, बेसण, नाचणीचे पीठ - प्रत्येकी १ वाटी
उडदाचे पीठ - अर्धी वाटी
हिरव्या मिरचीचा ठेचा - आवश्यकतेनुसार
आलं-लसूण-जिरे पेस्ट - आवश्यकतेनुसार
शेंगतेल - २ चमचे
मीठ - चवीनुसार
हळद - आवश्यकतेनुसार
कृती -
सुरुवातील वरील सर्व पीठे एकत्र करुन घ्या. यात दोन चमचे शेंगतेल टाका. नंतर या मिश्रणात आवश्यकतेनुसार हिरव्या मिरचीचा ठेचा, आलं-लसूण-जिऱ्याची पेस्ट टाका. याशिवाय यात चिरलेली बारिक कोथिंबीर, हळद, आणि मीठ घालून हे मिश्रण पाण्याने सैलसर मळून घ्या. मळलेल्या पीठाचा गोळा काही काळासाठी भिजत ठेवा. यानंतर या पीठाच्या लाटोळ्या करुन घ्या. लाटोळ्या (वर फोटो दाखवल्याप्रमाणे हाताने छोट्या छोट्या लांबलचक गोल लाटोळ्या तयार करुन घ्या.) आता एका बाजूला पाणी उकळत ठेवा. उकळलेल्या पाण्यावर हलकेसे तेल लावून मोदक पात्राच्या चाळणीत ह्या लाटोळ्या ठेवा. दहा ते पंधरा मिनिटांनी हे उकडून तयार होईल. तुम्ही चहा किंवा कोणत्याही चटणीसोबत हे शेंगुळे खाऊ शकता.
हेही वाचा: अस्सल गावरान चवीची वरण्याची (पावटा) बिनतेलाची आमटी
Web Title: Traditional Recipe Of Shengole How To Cook In Less Time
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..