Recipe: आज Sunday Special घरीच बनवा महाप्रसादासारखा टेस्टी मसालेभात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मसालेभात

Recipe: आज Sunday Special घरीच बनवा महाप्रसादासारखा टेस्टी मसालेभात

आज रविवार असल्याने काय स्पेशल करावं, हा कायमच प्रश्न येतो. नेहमी नेहमी तेच तेच खाल्ल्याने आपल्यालाही कंटाळा येतो. आज आम्ही तुम्हाला रविवार स्पेशल एक हटके रेसिपी सांगणार आहोत. ती म्हणजे मसालेभात. अगदी महाप्रसादासारखा चवदार मसालेभात कसा करायचा, हे आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

हेही वाचा: Diwali Recipe: दिवाळी स्पेशल पारंपरिक पद्धतीने खजुऱ्या कशा तयार करायच्या?

साहित्य:

 • जिरे

 • हिंग

 • कढीपत्ता

 • आलं पेस्ट

 • हिरवी मिरची पेस्ट

 • टमाटा

 • हळद

 • धने पूड

 • गरम मसाला

 • तांदूळ

 • तेल

 • मोहरी

 • कांदे

 • लाल तिखट

 • फुलावर

 • बटाटे

 • पाणी

 • मीठ

 • घी

हेही वाचा: Food Recipe : 'या' सोप्या पद्धतींनी काही मिनिटांत घरीच बनवा चुरमुरे

कृती :

1) सर्वप्रथम तांदूळला दोनदा धुवून २० मिनीटे बाऊल मध्ये पाणीत भिजवून ठेवा.

2) मग कुकरला गॅस वरती मध्यम आचेवर ठेवा आणि त्यात 1 टीस्पून तेल घालून गरम करा.

3) गरम झाल्यावर त्यात कृती प्रमाणे मोहरी,जीरे,हिंग,कढीपत्ता,आलं पेस्ट,हिरवी मिरची पेस्ट घालून 1 मिनीट परतून घ्या.

4) आता टमाटे घाला व मऊ होईपर्यंत परतून घ्या.

5) परतून झाल्यावर त्यात कृती प्रमाणे धने पूड,हळद,गरम मसाला,लाल तिखट घालून मीक्ष करुन घ्या.

6) आता यात कापलेले फुलावर,बटाटे घालून मीक्ष करुन त्यात भिजवलेले तांदुळ घाला व त्या मला व्यवस्थित मीक्ष करुन घ्या.

7) तांदूळ मीक्ष झाल्यावर त्यात गरजे नुसार पाणी व चवीनुसार मीठ आणी तुप घालून मीक्ष करा मग कुकरला झाकण लावून 2 शिट्टी होईपर्यंत शिजवून घ्या.

- रामेश्वर चित्ते (फूड ब्लॉगर)