Vada Kombda Recipe : रविवारच्या दिवशी कोंबडी वड्याचा बेत तर झालाच पाहिजे राव!

रविवारीच हॉटेल अन् मटणाची दुकानेही गर्दीने हाऊसफुल असतात.
Vada kombda Recipe
Vada kombda Recipeesakal

रविवार म्हणजे सुट्टीचा वार, त्यादिवशी लोक दुपारच्या जेवणात गच्च मटणावर ताव मारतात आणि दिवसभर ताणून देतात. आठवडाभर धावपळ करणाऱ्या लोकांसाठी यापेक्षा वेगळं सुखं ते काय. त्यामूळे रविवारी मासांहाराला जास्त मागणी असते. रविवारीच हॉटेल अन् मटणाची दुकानेही गर्दीने हाऊसफुल असतात.

तूम्हालाही आजचा रविवार एकदम स्पेशल बनवायचा असेल तर वडा कोंबड्याचा खास बेत तूम्ही आखू शकता. कारण, ते बनवायलाही सोपे आणि खायलाही चविष्ट आहे. बरं सतत चपाती, भाकरी खाऊन आलेला कंटाळा दुर करायचा असेल तर त्यासाठी वडे हा चांगला पर्याय ठरू शकतात. (Vada Kombda Recipe :Sunday special vada kombda recipe in Marathi) 

कोकणाची खासियत असलेले वडे मिश्र डाळींच्या पिठापासून बनलेले असतात. त्यामूळे त्यातून आपल्याला पोषक पदार्थही मिळतात. त्यामूळे एकंदरीत रविवार झकास बनवायचा असेल तर कोंबडी वड्याचे नियोजन करायलाच लागतंय.

Vada kombda Recipe
Chaat Recipe: विकेंड स्पेशल घराच्या घरी बनवा चना बूंदी चाट रेसिपी...

वडा कोंबडा बनवण्यासाठी साहित्य

सर्वात आधी गावठी कोंबडीचे पिस २ ते ३ तास आधी मॅरीनेट करून फ्रीज मध्ये ठेवा. त्यानंतर कोमट पाण्यात खसखस भिजवून ठेवा. वाटणासाठीचा कच्चा कांदा, लवंग, मिरी, दालचिनी,काजू, धने,शहाजिरे,ओलं खोबरं आणि कोमट पाण्यात भिजवलेली खसखस हे सगळे मसाल्याचे पदार्थ कोमट पाणी घालून बारीक वाटून घ्या.

भांड्यात तेल गरम करून कांदा फोडणीला टाका. कांदा गुलाबीरंगावर परतल्यावर त्यामध्ये हळद , लाल तिखट आणि टोमॅटो घालून तेल सुटे पर्यंत परता. त्यामध्ये मसाला घालून ते परता. वाटणा पुरती मीठ घाला. 

Vada kombda Recipe
Chicken Fry Recipe: रविवार स्पेशल चिकन फ्राय कसे तयार करायचे?

या भांड्यात आता चिकन घाला. चिकनला पाणी सुटे पर्यंत ढवळत रहा. त्यानंतर त्यात गरजेनूसार पाणी घाला. १५-२० मिनिटे झाकण लावून चिकन शिजू द्या. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

चिकन मॅरीनेट केल्याने ते पटकन शिजते. त्यामूळे जास्त पाणी घालू नका. वाफेवरच शिजवलेले चिकन गावरान चव देते.

Vada kombda Recipe
Food Tricks : राजमा चावल खायचाय, पण राजमा भिजवायचा विसरलात? हि सोप्पी ट्रिक करेल मदत!

वड्याची भाजणी

जाडा तांदूळ-१ किलो, चणा डाळ - १०० ग्रॅम, उडीद डाळ - ५० ग्रॅम, धणे - १ टेबलस्पून, जीरे - १ चमचा, बडीशेप- १ चमचा, मेथी दाणे - १/२ टीस्पून

वडे बनवायची कृती
वड्याच पीठ - ३ कप, कांदा- १ मोठा, हिरवी मिरची- २ ते ३, कोथिंबीर – मुठभर, आलं - १/२ इंच
लसूण - ५ ते ६ पाकळ्या, हळद- १/२ टीस्पून, मीठ- चवीनुसार, तेल- तळण्यासाठी आवश्यक

Vada kombda Recipe
Food Allergy in Children: जरा खाल्लं तरी उलट्या करतं बाळ; या अॅलर्जीवर उपाय काय ?

कांदा, मिरची, आल, लसूण, मिरची वाटून घ्या. एका परातीत पीठ, हळद, मीठ आणि गरम पाणी टाकून चपातीच्या कणकेप्रमाणे घट्ट मळून घ्या. रात्रभर उबदार जागेत झाकून ठेवा. सकाळी पीठ फुगून येईल. छान मऊ झालेलं असेल.


एक भिजलेल्या सुती कपड्याचा तुकडा पोळपाटावर पसरून लिंबाएवढ्या आकाराचे पीठाचे गोळे करून वडे थापून घ्या. तेल गरम करून मध्यम आचेवर वडे व्यवस्थित तळून घ्या. आणि गरमा गरम चिकनसोबत टेस्ट करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com