Food Tricks : राजमा चावल खायचाय, पण राजमा भिजवायचा विसरलात? हि सोप्पी ट्रिक करेल मदत! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Food Tricks

Food Tricks : राजमा चावल खायचाय, पण राजमा भिजवायचा विसरलात? हि सोप्पी ट्रिक करेल मदत!

जेव्हा आपण पालेभाज्या आणि इतर फळभाज्या खाऊन कंटाळतो तेव्हा काहीतरी चमचमीत, मसालेदार खायची इच्छा होते. विकेंडही आलेला असतो त्यामूळे वेळ काढून केले जाणारे पदार्थ या दिवशी हमखास बनतात.

हेही वाचा: Chutney Batata Recipe : तिच तिच भाजी पोळी खाऊन कंटाळा आलाय? ट्राय करा चटपटीत चटणी बटाटा रेसिपी

राजमा किंवा सारखा पदार्थ करायला तो आधी भिजवायला लागतो. पण, अनेकदा तो भिजत घालणे आपण विसरतो. सहसा विकेंडला घरचे काम कमी लागावे आणि आराम करायाला मिळावा यासाठी हलके फुलके आणि पटकण होणारे पदार्थ करण्यावर गृहिणींचा भर असतो.

हेही वाचा: Food Eating Tips: रिकाम्या पोटी 'हे' पदार्थ अजिबात खाऊ नका नाहीतर...

यामध्ये राजमा-भात, छोले-भात, पुलाव किंवा खिचडी यांसारखे पदार्थ हमखास बनवले जातात. राजमा किंवा चणे मसालेदार आणि स्वादिष्ट करीमध्ये शिजवले जातात. त्यासोबत भात आणि कोशिंबीर दिली जाते. राजम्याचा बेत आखला तर त्याची तयारी रात्रीपासूनच करावी लागते. कारण, राजमा किंवा छोले बनवण्यासाठी सर्वप्रथम ते रात्रभर भिजवावे लागतात.

हेही वाचा: Food Tips : भाजीत मीठ जास्त झाल्यास काय कराल ?

राजमा आणि छोले हे दोन्ही पदार्थ कठीण असतात. त्यामूळे त्यांना शिजवण्यासाठी वेळ लागतो. म्हणूनच ते सहा ते आठ तास किंवा रात्रभर पाण्यात भिजत घालावे लागतात. बीन्स भिजवल्याने बाहेरील थर मऊ होतो आणि त्यांना उकळणे सोपे होते.

हेही वाचा: Food Tips : तूम्हीही शिजवण्याआधी चिकन स्वच्छ धुता का?; संशोधकांचा धक्कादायक खुलासा वाचाच!

पण, तूम्ही राजमा भिजवायला विसरला असाल तर काय करावे? हे समजत नसेल तर तूमच्यासाठी शेफ पंकज भदौरिया यांनी त्यांच्या ताज्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये बीन्स लवकर भिजवण्याची एक सोपी आयडीया शेअर केली आहे.

हेही वाचा: Winter Recipe: हिवाळ्यात खायला पौष्टिक असणारं मेथीच्या भाजीच्या पिठलं कस तयार करायचं?

राजमा भिजवण्यासाठी तूम्हाला इथे कॅसरोलचे एक भांडे घ्यावे लागेल. जे पदार्थ बराच काळ गरम ठेवण्यास मदत करते. तेच भांडे घ्या. त्यामध्ये राजमा किंवा छोटे घ्या. त्यामध्ये गमर पाणी ओता आणि त्या भांड्याचे झाकण लावून एक तास तसेच ठेऊन द्या.

हेही वाचा: Healthy Food : तांदुळ, रव्याची इडली खाऊन कंटाळलात? आता बनवा गाजराची पौष्टीक इडली!

एका तासानंतर जेव्हा तूम्ही भांड्याचे झाकण काढाल तेव्हा तूम्हाला जादू झालेली दिसेल. होय, तूम्ही रात्रभर भिजवल्यावर जसे छोले मऊ होतात तसेच छोले या भांड्यात भिजतात.