भाजीपोळी खाऊन कंटाळलात? मग एकदा 'वरणफळ' ट्राय करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वरण फळ

भाजीपोळी खाऊन कंटाळलात? मग एकदा 'वरणफळ' ट्राय करा

रोज भाजीपोळी खाऊन प्रत्येकाला कंटाळा येतो. यात काहीतरी नवीन खाण्यास प्रत्येकाला आवडते पण मुळात भाजी पोळी शिवाय काय नवीन खावं, हा प्रश्न निर्माण होतो. आज आम्ही तुमचा हा प्रश्न कायमचा सोडवणार आहोत. वरण फळ ही नवी रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जे शरीरास पौष्टीक असतं. चला तर जाणून घेऊया वरण फळाविषयी.

वरण फळांसाठी लागणारे साहित्य:

1) गव्हाचे पिठ

2) मीठ

3) तेल

4) तुरीची डाळ

5) हिरवी मिरची,लसूण पाकळ्या पेस्ट

6)फोडणीसाठी थोडा हिंग, कढिपत्ता आणि मेंथीचे दाणे

वरणफळाची कृती:

1) गव्हाचे पिठ, मीठ आणि थोडसं तेल घालून पोळीसाठी मळतो तशी कणिक मळून ठेवायची.( घरातील सदस्यानुसार पिठ आणि दाळ याचा अंदाज घ्यावा)

2) नंतर पिठाच्या अंदाजानुसार तुरीची डाळ घेऊन ती स्वच्छ धुवून अंदाजे कुकर मध्ये हळद मीठ घालून शिजवून घ्यायची( अंदाजे ३ ते ४ शिट्ट्या)

3)नंतर दाळ शिजवून झाल्यावर परत १ ते २ ग्लास गरम पाणी टाकून उकळुन घ्यावी.

नंतर उकळलेल्या वरणाला मस्त मोहरी, कढिपत्ता, जिरे, मेथीचे दाणे आणि हिरवी मिरची पेस्ट घालून तुपात फोडणी घालून घ्यायची आणि वरणाला उकळी येऊ दयायची.

4) नंतर वरणाला उकळी येत असताना कणकेची पोळी लाटावी. आणि एका पोळीचे चार भाग करुन ते उकळत्या वरणात हळूहळू सोडावेत. १० मिनीटे उकळी काढून वरण फळं शिजू द्यावी.

5) वरण फळं ताटात वाढून त्यावर साजूक तूप घालून गरमागरम सर्व्ह करावे.

टिपः पिठ मळतांना थोडं तेल टाकल्यास वरणफळ अजून चवदार लागते.

टॅग्स :lifestylerecipefood news