चांगल्या क्वालिटीचं मटण कसं विकत घ्यायचं? फॉलो करा या टिप्स

चांगल्या क्वालिटीचं मटण खरेदी करणं, हे फक्त आपल्याच नाही, तर आपल्या कुटूंबीयांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचं असते.
Way to buy best quality mutton
Way to buy best quality muttonSakal

Way to buy best quality Mutton: मटणावर ताव मारायला अनेकांना आवडतं. कित्येकजण आठवड्यातून किमान एकदा तरी चमचमीत मटणावर ताव मारतात. लोक मटण खायचे शौकीन तर असतात, पण ज्यावेळी मटण शॉपमधून मटण खरेदी करायचा विषय येतो, तेव्हा मात्र अनेकांना त्याची क्वालिटी कशी आहे, हे ओळखता येत नाही. परिणामी मटणाची चवतर बिघडते, परंतु आरोग्याचे प्रश्नही निर्माण होतात. म्हणूनच चांगल्या क्वालिटीचं मटण खरेदी करणं, हे फक्त आपल्याच नाही, तर आपल्या कुटूंबीयांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचं असते. परंतु बाजारातून चांगल्या क्वालिटीचं आणि ताजे मटण खरेदी करायचं हे आज आपण पाहणार आहोत.

1. आपण मटण खरेदी करण्यासाठी शॉपमध्ये गेल्यावर तेथील टांगलेल्या मटणावर वर एक नजर टाकावी.

2. साधारणपणे आकारावरून तुम्हाला बोकड किंवा बकऱ्याच्या वयाचा अंदाज लावता येऊ शकतो. मध्यम आकाराच्या बकऱ्याचं मटण सर्वोत्कृष्ट असतं. कारण बोकड किंवा बकरे जर लहान असेल तर असं मटण लवकर शिजतं आणि त्याची राळ होण्याची शक्यता असते.

Way to buy best quality mutton
फक्कड मटण खायचंय! पुण्यातली 'ही' ठिकाणं आहेत बेस्ट

3. बोकड किंवा बकरा जास्त मोठा असेल तर मटण शिजायला वेळ लागतो आणि असं मटण चवीला फार चांगलं लागत नाही.

4. मटण घेताना हाडं आणि मऊ मांस समप्रमाणात घ्यावं. हाडांमुळं मटणाच्या रश्याला चांगली चव येते.

5. सिन्याचा भाग खाण्यासाठी सर्वात चांगला लागतो. यात हाडं आणि मऊ दोन्ही मिळतं. त्याशिवाय हाडं लहान असल्याने चघळून खायलाही मजा येते.

6. मटण खरेदी करताना मांडीचाही थोडा भाग घ्यावा. यात एक नळी असते. या नळीतील गुद्दू ओढून खाताना प्रचंड आनंद मिळतो.

7. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मटण विक्रेत्याला काळजाचा तुकडा आठवणीनं टाकायला सांगावा.

Way to buy best quality mutton
मटण खाल्ल्यानंतर हे पदार्थ खाणे टाळा; अन्यथा या परिणामांना तयार राहा

8. यासोबतच त्याच्याकडून थोडीशी चरबीसुद्धा घ्यावी, यामुळे सुक्क्या मटणाच्या चवीत दुपटीने वाढ होते.

9. मटण घरी आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावं. मग ते पितळ किंवा अॅल्युमिनियमच्या पातेल्यात शिजवायला टाकावे. त्यामुळे मटणास सर्वोत्तम चव येते. कुकर सहसा वापरू नये, त्यामुळे मटण बेचव होतं.

10. मटण शिजतांना फक्त कांदा हळद आणि मीठ घालून आणि गरम पाणी घालून शिजवाव. मटम शिजवताना तेल टाकू नये. लहानग्यांसाठी मिठाचा रस्सा वेगळा काढावा. मोठ्यांसाठी हाच रस्सा सूप म्हणून देता येऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com