esakal | घरी पार्टी असेल तर ट्राय करा व्हेज बिर्याणी
sakal

बोलून बातमी शोधा

veg biryani easy recipe for housewife in kolhapur

तयार भाताममध्ये घाला वरून गार्निंशिंगसाठी कांद्यासोबत आणि कोथिंबिरी घालून बिर्याणी सर्व्ह करा.

घरी पार्टी असेल तर ट्राय करा व्हेज बिर्याणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : व्हेजबिर्याणी तयार करायची आहे, तर मग अशा आहेत स्टेप

मुख्य सामग्री :

1 कप बासमती राईस
1 कप उभा चिरलेला कांदा 
1 कप कोबी
1 कप उकडलेले बीन्स
1 कप गाजर
1/2 कप वाटाना
1 चमचा लसूण 
1 चमचा आले 
1 कप टोमॅटो प्यूरी
आवश्यकतेनुसार पुदीन्याची पाने
आवश्यकतेनुसार कोथींबीर 
3 चमचा तूप 
1 कप दही
1 - दालचीनी
3 - तमालपत्र
3 - लवंग
 आवश्यकतेनुसार मीठ 
1 छोटा चमचा लाल तिखट
आवश्यकतेनुसार जीरे
1 छोटा चमचा गरम मसाला पाउडर
आवश्यकतेनुसार पाणी
आवश्यकतेनुसार काळी इलायची 
 

कृती - 

एका भांड्यात तांदूळ घ्या. पाच - दहा मिनीट त्याला भिजवून ठेवा. एका पॅनमध्ये तांदळाच्या अनुसार पाणी मिक्स करा. कढीपत्ता, खडा मसाला, इलायची घ्या यात एक चमचा तूपात टाका. आता एका पॅनमधे थोडे तूप घ्या. त्यामध्ये हिंग, जीरा, आलं-लसूणाची पेस्ट आणि चिरलेला कांदा टाका. जेव्हा लसून लाल होईल तेव्हा त्यामध्ये इलायची आणि कढीपत्ता टाका. कोबी, गाजर, बिन्स एकत्र कट करुन घ्या. मिश्रण केलेले हे दोन ते तीन मिनिट गरम होऊ द्या. त्यामध्ये थोडंसं मीठ घाला आणि त्याला शिजवून घ्या.

यानंतर त्यात टोमॅटो पेस्ट घाला आणि ते मिश्रण एकत्र करा. हळद पावडर मीठ आणि दही घालून त्या सगळ्या भाज्या नरम होईपर्यंत शिजवून घ्या. एक मिनिटासाठी कोळशाचे तुकडे गरम करा. ते एका बाउल मध्ये ठेवा, आणि त्या कोळाशावर तूप सोडा. आणि पाच मिनिटांसाठी ते त्या भांड्यात ठेवा. आता भांड्याला झाकणाने बंद करा. यानंतर एका बाऊलमध्ये भाज्या घ्या. भाज्या त्या तयार भाताममध्ये घाला वरून गार्निंशिंगसाठी कांद्यासोबत आणि कोथिंबिरी घालून बिर्याणी सर्व्ह करा.

loading image
go to top