

Viral Korean Egg Drop Sandwich Recipe
esakal
Korean Egg Drop Sandwich: सध्या जगभरातील खवय्यांमध्ये आणि सोशल मीडियावर 'कोरियन एग ड्रॉप सँडविच'ने (Korean Egg Drop Sandwich) धुमाकूळ घातला आहे. दक्षिण कोरियातील 'एग ड्रॉप' (Egg Drop) या प्रसिद्ध ब्रेकफास्ट फ्रँचायझीमुळे लोकप्रिय झालेले हे सँडविच दिसायला जितके आकर्षक आहे, तितकेच ते चवीलाही अप्रतिम असते. बटरमध्ये शेकलेला गरमागरम टोस्ट, मऊमऊ (Fluffy) स्क्रॅम्बल एग्स, वितळलेले चेडर चीज, क्रिस्पी बेकन आणि गोड-तिखट क्रीमी सॉसचा मेळ या सँडविचला अतिशय खास बनवतो.
कोरियाला न जाता किंवा महागड्या रेस्टॉरंटमध्ये न जाता, फक्त १० मिनिटांत हे हॉट अन् टेस्टी सँडविच घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे, याची सविस्तर रेसिपी खालीलप्रमाणे आहे.