

Aloo Methi Paratha Recipe:
Sakal
Aloo Methi Paratha Recipe: हिवाळ्यात थंडगार सकाळी गरमागरम नाश्ता मिळाला, तर दिवसाची सुरुवातच आनंदाने होते. अशा वेळी झटपट तयार होणारे आणि चविष्ट पदार्थांचीच जास्त मागणी असते. आलू मेथी पराठा हा त्यातलाच एक परफेक्ट पर्याय आहे. ताज्या मेथीच्या पानांचा सुगंध, उकडलेल्या बटाट्यांचा मऊ टेक्चर आणि हलक्या मसाल्यांनी केलेली चविष्ट भरणी—हे पराठे केवळ चवीलाच उत्तम नसतात तर पौष्टिकही असतात. मेथीत असलेले आयर्न आणि फायबर शरीराला ऊर्जा देतात, तर बटाटे पोटभरीचा नाश्ता देतात. सर्वात खास म्हणजे ही रेसिपी अतिशय सोपी असून कमी साहित्यात घरच्या घरी पटकन तयार होते. दही, पिकल किंवा तूपासोबत हे गरम पराठे सर्व्ह केले तर वीकेंडचा नाश्ता आणखी खास बनतो. एकदा करून पाहिला की हा पदार्थ तुमच्या ब्रेकफास्ट लिस्टमध्ये कायम जागा मिळवेल याची खात्री!