
High Protein Paratha Recipes
Esakal
थोडक्यात:
वजन कमी करायचं असेल तर प्रथिनयुक्त आणि पोषणमूल्य असलेले हे ६ पराठे आहारात समाविष्ट करा.
सत्तू, मेथी, पनीर, मटार, अंडी आणि मूगडाळ यासारख्या नैसर्गिक घटकांनी बनलेले पराठे चविष्ट आणि आरोग्यदायी आहेत.
हे पराठे स्नायू वाढवतात, भूक नियंत्रणात ठेवतात आणि दीर्घकाळ तृप्तता देतात.
High-Protein Parathas in a Weight Loss Diet: पराठा म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर तुपात खरपूस भाजलेला गरमागरम आणि स्वादिष्ट असा नाश्ता येतो. पण तुम्ही विचार केला आहे का, की पराठेही 'हाय -प्रोटीन डाएट'चा एक भाग बानू शकतात? होय! जर अंडी, शेक्स किंवा पावडर यांच्याशिवाय आपण नैसर्गिक पद्धतीने प्रथिने मिळवू शकतो. हे सुद्धा आपल्या रोजच्या जेवणातून.