esakal | आपण आवडीने खात असलेल्या 'चिकन नग्टेस'चा शोध कोणी लावला?

बोलून बातमी शोधा

chicken nugget

आपण आवडीने खात असलेल्या 'चिकन नग्टेस'चा शोध कोणी लावला?

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

नागपूर : चिकन नग्टेस हे एक अमेरिकन खाद्य आहे. हा एक चांगला प्रथिनांचा स्त्रोत देखील आहे. अनेक दशकांपासून चिन नग्हेट्स हे अमेरिकेचे फास्ट फूड रेस्टारंट आणि ग्रोसरीमध्ये विक्रीसाठी ठेवलेले दिसतात. मात्र, अमेरिकन लोकांच्या दैनंदिन जीवनातील आहारामध्ये याचा समावेश नसतो. मात्र, याचा शोध कोणी लावला आणि यामागची कहाणी काय आहे? हे आपल्याला माहिती आहे का?

दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान अमेरिकेमध्ये लाल मांसानंतर चिकन हेच सर्वांच्या प्रथिनांचे मुख्य स्त्रोत बनले होते. त्यावेळी कोंबडी हा पक्षी देखील स्वस्त मिळायचा. त्यामुळे याची मागणी वाढली असल्याचे चिकन: अमेरिकेच्या आवडत्या अन्नाचे धोकादायक परिवर्तन या पुस्तकाचे लेखक व मानववंशशास्त्रज्ञ स्टीव्ह स्ट्रिफलर म्हणतात. दुसर्‍या महायुद्धात मोठ्या प्रमाणात चिकनचा प्रसार, आधुनिकीकरण आणि औद्योगिकीकरणाला प्रोत्साहन देण्यात आल्याचेही ते सांगतात. महायुद्धाच्या शेवटी सैन्य दलाकडून देखील चिकनची मागणी होऊ लागली. त्यामुळे युद्ध अन्न प्रशासक या अंतर्गत पेनिनसुला येथे मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्यात आला. त्यामुळे दक्षिण आणि मध्यपश्चिम भागातील पुरवठादारांना मोठी बाजारपेठ देखील निर्माण झाली. मात्र, जेंव्हा महायुद्ध संपले पोल्ट्रीची मागणी अचानक घटली. लाल मांस उपलब्ध होत होते. त्यामुळे चिकनची मागणी घटली. मात्र, कोणी मागितले तरी पूर्ण पक्षी त्यांना विकत दिले जात होते. तसेच तो पूर्ण पक्षी भाजून खाणे यामध्ये देखील खूप वेळ जायचा. यामुळे काम करणाऱ्या स्त्रियांच्या नाकी नऊ यायचे. अमेरिकेत चिकनची मागणी वाढावी, यासाठी पुन्हा काही नवीन शोध लागतील असे वाटू लागले.

हेही वाचा: 'वयात बसत नसताना फडणवीसांच्या पुतण्याला लसीचा दुसरा डोस मिळालाच कसा?'

रॉबर्ट सी. बेकरने चिकन नग्टेसचा शोध लावला -

चिकन नग्टेसचा शोध कोणी लावला यावर बरे वाद आहेत. तरीही कृषीवैज्ञानिक रॉबर्ट सी. बेकर यांनी कॉर्नेल विद्यापीठाच्या प्रयोगशाळेमध्ये १९६३ साली चिनक नग्हेट्सचा शोध लावल्याचे मानले जाते. त्यांच्याकडे डझनभर पोल्ट्री असल्याचे बोलले जाते. यामध्ये टर्की हॅम आणि चिकन हॉट डॉगचा देखील समावेश आहे. याच्या सहाय्याने त्यांनी अमेरिकेची पोल्ट्री इंडस्ट्रीला नावारुपाला आणले.

रॉबर्ट हे पोल्ट्री जगात बदल घडवून आणणारे आणि ते चालविणारे चालक होते, असे स्टिफर सांगतो. फक्त पोल्ट्रीमध्ये जास्त नफा नसून चिकनवर काहीतरी प्रोसेस करून जास्त नफा कमाविता येईल, असे त्यांच्या लक्षात आले. त्यासाठी त्यांनी बोनलेस चिकनचे तुकडे वेगळे काढून त्याला ब्रेडच्या पावडरमध्ये मिसळून तळले. तयार झालेला हा पदार्थ थंडा मात्र, तळणे आणि त्याला फ्रीज्ड करणे हे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी खूप गुंतागुंतीचे ठरत होते. तरीही त्याने ते केले. त्याच्या चिकन स्टीकने त्याला जॉर्ज वाशिंगटन कार्वर ऑफ चिकन असे टोपण नाव देखील मिळवून दिले. मात्र, या बेकरने कधी याचे पेटंट मिळविण्याचा प्रयत्न केला नाही. याउलट त्याने शेकडो अमेरिकन कंपन्यांना रेसिपी मेल केली जेणेकरून त्या बेकरच्या संशोधनामधून मोठ्या प्रमाणात नफा कमवू शकतील. मात्र, अमेरिकन या चिकन नग्टेसवर आरोग्याच्या दृष्टीतून विश्वास ठेवतील का? हा देखील प्रश्नच होता.

हेही वाचा: मुंबईतील हेवीवेट मंत्र्यांना रेमडेसिव्हीर दिले, पण नागपूरसोबत भेदभाव - फडणवीस

लाल मांस खाण्याची भीती -

अमेरिकन लोकांनी लाल मांस कमी खावे, असा फतवा १९७७ साली काढण्यात आला. त्यामुळे फॅट वाढण्याच्या भीतीने अमेरिकन लोकांना बीफ, दूख आणि लोणी खाण्याची भीती वाटू लागली. आयुष्य कमी होण्याच्या भीतीने लाल मांस खाणाऱ्यांची संख्या कमी झाली. त्यामुळे लाल मांसाला पर्याय म्हणून चिकन समोर आले.

चिकन मॅकनग्टेसचा शोध कधी लागला? -

लाल मांसाला पर्याय म्हणून अमेरिकन लोकांनी चिकनला पसंती देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी नवीन पदार्थ तयार करावे, असे मालक रे क्रॉक यांचे मत होते. त्यामुळे प्रेरीत होऊन मॅकडोनाल्डने १९८१ मध्ये चिकन मॅकनग्हेट्स बाजारात आणले. मात्र, मॅकडोनाल्डचे चेअरमन फ्रेड टर्नर हे प्रोडक्शन कसे करायचे याबाबत अगदीच अनभिज्ञ होते. त्यांनी फ्रेंच फ्राईजसारखे बोनलेस चिकन विकण्यास सुरुवात केली. त्यानंतर मॅकडीने शेफ रेने अर्नेड या शेफला ठेवून घेतला. त्याने सॉसचा वापर करून फ्राईड चिकन तयार केले. त्याला कॉर्पोरेट ऑफिसमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, मॅकडीच्या फ्रांचॅयजीसाठी त्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊ शकले नाही. त्याचवेळी चिकन पॉटची संकल्पना देखील उदयास आली. पण काही कारणास्तव ती देखील रद्द ठरविण्यात आली. त्यानंतर चिकन-चॉपिंग प्रक्रिया स्वयंचलित करण्यासाठी मॅक्डॉनल्ड्सने फ्रोजन हॅम्बर्गरची निर्माता कीस्टोन फूड्स भाड्याने घेतली. त्यानंतर फ्रोजन फिश स्टीकसाठी ओळखले जाणारे गॉर्टॉन देखील त्यांनी आणले. त्याद्वारे मोठ्या प्रमाणात फ्राईड चिकन तयार करणे शक्य होणार होते.

मॅकडीने त्यांच्या मॅकनग्हेट्समध्ये चांगली प्रतिमा तयार केल्यानंतर १९८३ मध्ये पीक चिकन नग्ह्टेस मॅनिया बाजारात आले. त्यानंतर २०१८ मध्ये मॅकडी पुन्हा शेजवान सॉसची लिमिटेड एडीशन आणली. जेव्हा पूर्ण सॉसची विक्री झाली तेव्हा तर ग्राहकांनी अक्षरशः दंगा केला होता.