Winter Recipe : दिल्ली स्टाईल सरसो का साग कसा तयार करायचा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sarsoka saag

Winter Recipe : दिल्ली स्टाईल 'सरसो का साग' कसा तयार करायचा?

Sarsoka saag: हिवाळ्यात खाल्ली जाणारी सरसो का साग' ही उत्तर भारतातील प्रसिद्ध रेसिपी आहे. मोहरीची पाने, पालक आणि चाकवतपासून ही भाजी तयार केली जाते. या भाजीची चव अधिक वाढवण्यासाठी कांदा, लसूण, मिरचीचाही समावेश केला जातो. मी जेव्हा दिल्लीला होते तेव्हा चवदार लागणारा सरसो का साग आणि मक्केची भाकरी खाण्याचा योग्य आला होता. त्यामुळे आता आपसूकच थंडीची चाहूल लागली की जिभेला सरसो का सागची आठवण होते.त्यामुळे हिवाळ्यात पौष्टिक सरसो का साग कसा करायचा याची रेसिपी पाहू या..

आता बघु या मोहरीची भाजी खाण्याचे काय काय आहेत फायदे?

1) मोहरीच्या भाजीत फायबरचं प्रमाण भरपूर असतं. शिवाय या भाजीत उष्मांकाचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे वजन कमी करण्यसाठी ही भाजी खाणं फायदेशी मानलं जातं.

2) मोहरीची भाजी खाल्ल्याने चयापचय क्रिया सुधारते. त्याचाही फायदा वजन कमी होण्यासाठी होतो.

3) मोहरीची भाजी खाल्ल्यानं शरीरात फोलेट निर्माण होण्यास चालना मिळते. कोलेस्टेराॅलचं प्रमाणही ही भाजी खाल्ल्याने नियंत्रित राहातं. म्हणूनच हदयाच्या आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी ही भाजी उपयुक्त मानली जाते. 

4) मोहरीची भाजी करतना त्यात पालकाची भाजीही घातली जाते. त्यामुळे मोहरीच्या भाजीतील पौष्टिकता आणखीनच वाढते. 

5) मोहरी आणि पालक यांच्या एकत्रित सेवनामुळे सोडियम, प्रथिनं, ॲण्टिऑक्सिडण्टस, अ, क, के ही महत्त्वाची जीवनसत्त्वं मिळतात. या भाजीत लोहाचं प्रमाणही भरपूर असतं. त्यामुळे मोहरीची भाजी खाताना चवीची तृप्तता तर होतेच शिवाय शरीरातील रक्ताची कमतरताही भरुन निघण्यास मदत होते.  

4) मोहरीची भाजी हिवाळ्यात वरचेवर खाल्ल्यास ॲनेमिया होण्याचा धोका टळतो. ॲनेमिया असल्यास तो कमी होण्यास ही भाजी मदत करते. मोहरीची  भाजी खाल्ल्यानं शरीरास ऊर्जा मिळते. 

चला तर मग आजच्या लेखात आपण पाहू या दिल्ली स्टाईल सरसो का साग कसा तयार करायचा त्याची सविस्तर रेसिपी...

साहित्य 

एक जुडी मोहरीची भाजी(पाने)

अर्धा जुडी पालक

अर्धा जुडी बथुआ साग

एक बारीक चिरलेले कांदा

लसूण आल्याची पेस्ट

चार ते पाच हिरव्या मिरच्या

चार चमचे तूप

एक चमचा बटर

तिन चमचे मक्याचे पीठ

चवीनुसार सैंधव मीठ

पाणी

कृती:

मोहरीची पाने, पालक आणि चाकवत स्वच्छ पाण्याने धुवून चिरून घ्यावे. भाज्या चिरल्यानंतर पाच ते सात मिनिटांसाठी त्या गरम पाण्यात उकळून घ्याव्यात.

तोपर्यंत दुसऱ्या कढईमध्ये तूप गरम करायला ठेवावे. तुपात  आलं लसणाची पेस्ट परतून घ्यावी. यानंतर चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि कांदे देखील परतून घ्यावा.

यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पालेभाज्यांची पेस्ट तयार करा. ही पेस्ट फ्राय केलेल्या कांद्यामध्ये मिक्स करा आणि सर्व सामग्री नीट शिजू द्याली. चवीनुसार मीठ देखील मिक्स करा.भाजी घट्ट होईपर्यंत तीन ते चार मिनिटांसाठी शिजू द्यावी. यानंतर भाजीत चमचाभर तूप घालावे आणि मिश्रण मिक्स करा.तयार झाली आहे सरसो का साग रेसिपी. भाजीमध्ये थोडंसं बटर देखील मिक्स करा आणि गरमागरम भाजीचा भाकरी किंवा पोळीसोबत आस्वाद घ्यावा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही उत्तर भारतातील मंडळीसारखे मकेच्या पिठाच्या भाकरी सोबत सुध्दा सरसो का साग हा खाऊ शकता.