
थंडीत गरम, चटपटीत खाण्याची इच्छा होतेच. आपल्या देशात अनेक भाज्या आणि फळे केवळ थंडीच्या मोसमातच मिळतात. यामुळेच थंडी आल्यावर घरोघरी हे विशेष पदार्थ बनवले जातात. देशातील विविध प्रांतांतील खास ‘विंटर डिशेस’चा आस्वाद तुम्ही या थंडीत घेऊ शकता.
‘दालचिनी’चा विंटर स्पेशल मेन्यू!
थंडीत गरम, चटपटीत खाण्याची इच्छा होतेच. आपल्या देशात अनेक भाज्या आणि फळे केवळ थंडीच्या मोसमातच मिळतात. यामुळेच थंडी आल्यावर घरोघरी हे विशेष पदार्थ बनवले जातात. देशातील विविध प्रांतांतील खास ‘विंटर डिशेस’चा आस्वाद तुम्ही या थंडीत घेऊ शकता कोथरूडमधील पौड रोड रस्त्यावरील ‘दालचिनी’ या रेस्टॉरंटमध्ये. ‘इंडिया ऑन युवर प्लेट’ अशी कन्सेप्ट असलेल्या ‘दालचिनी’मध्ये विंटर मेन्यू नुकताच सुरू झाला आहे. ‘दालचिनी’चे मालक चैतन्य अडगावकर यांनी या खास मेन्यूची माहिती दिली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
सरसों दा साग आणि मक्के दि रोटी
हिंदी सिनेमे आणि मालिकांमध्ये आपण या प्रसिद्ध पंजाबी पदार्थाचे नाव आणि गुणगान ऐकले आहे. अनेकांनी त्याची चव चाखलीही असेल, पण तुम्ही कधी ‘सरसों दा साग’चा आस्वाद घेतला नसल्यास तुम्हाला संधी आहे. पालक, मुळ्याच्या पानांसोबत शिजवलेली मोहरीची पाने आणि बथुवाची भाजी. सोबत मक्के दि रोटी आणि भरपूर लोणी, गुळाचाचा आस्वाद तुम्ही येथे घेऊ शकता.
उंधियो पुरी
हिवाळा आल्यावर आजकाल उंधियोच्या ऑर्डर्स सुरू होताना दिसतात. आपापल्या गुजराती मित्रांना उंधियोची फर्माईश तर होतेच होते. तुम्ही हिवाळ्यात मिळणाऱ्या खास भाज्यांपासून बनणाऱ्या याच उंधियोची चव ‘दालचिनी’मध्ये घेऊ शकता. तुवर, वालोर पापडी, सुरती पापडी, सुरण, रताळे, मेथी मुठिया इत्यादींची ही मिश्र भाजी म्हणजे खवय्यांसाठी एकाच डिशमध्ये असंख्य फ्लेवर्स आणि टेक्सचर्सची पर्वणीच! सोबत आहे पुरी आणि श्रीखंड. ‘उंधियो’ या नावाबद्दल सांगताना चैतन्य म्हणाले, ‘‘उंधियोचा अर्थच ‘उलटे’ असा होतो. उलट्या माठात ही भाजी शिजवली जात असल्यामुळे हे नाव पडले आहे.’’
शेफ संदीपची ‘माँ दी खिचडी’
थेट पंजाबची ही चव! ‘दालचिनी’चे शेफ संदीपच्या आईची ही खास डिश म्हणजे थंडीमध्ये मायेची ऊब. भात आणि सालासकट उडीद डाळ अगदी हळुवारपणे खूप वेळ शिजवतात. लोहरीच्या वेळेस हमखास बनवली जाणारी ही डिश वरून तूप घातल्यावर एकदम लज्जतदार लागते. या पदार्थांसोबतच ‘खिचडी और चार यार’ आणि ‘मिलागू रस्सम’चाही या विंटर मेन्यूमध्ये समावेश आहे.
खेकड्यांचा ‘निसर्ग’ - क्रॅब आणि लॉबस्टर फेस्टिव्हल
थंडीतले डेझर्ट्स
दिल्लीची खास गाजरे, तूप, खवा आणि सुकामेवा यांपासून बनवलेला गरमागरम हलवा म्हणजे थंडीतील पर्वणीच. थंडी म्हणजे स्ट्रॉबेरीचा सीझन. फ्रेश स्ट्रॉबेरी विथ क्रीमसाठी लगेच महाबळेश्वरला धाव घ्यावी लागणार नाही, याची काळजी ‘दालचिनी’ने घेतली आहे. ‘दालचिनी’चा हा विंटर मेन्यू फक्त ३१ जानेवारीपर्यंतच सुरू आहे.