फ्रेंचवासीयांना चढतोय वर्ल्ड कप फायनल ज्वर

वृत्तसंस्था
Thursday, 12 July 2018

पॅरीस, ता. 11 : विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेची बेल्जियमविरुद्धची उपांत्य लढत संपण्यापूर्वीच फ्रान्समध्ये जल्लोषास उधाण आले होते. स्पर्धेपूर्वी विजेतेपदाची पूर्ण खात्री नसलेले फ्रेंचवासीय आता फुटबॉलप्रमाणेच आर्थिक प्रगतीसही चांगलाच वेग लाभेल, अशी आशा बाळगून आहेत. त्यांना आतापासूनच आपणच जगज्जेते होणार, अशी खात्री वाटत आहे. 

पॅरीस, ता. 11 : विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेची बेल्जियमविरुद्धची उपांत्य लढत संपण्यापूर्वीच फ्रान्समध्ये जल्लोषास उधाण आले होते. स्पर्धेपूर्वी विजेतेपदाची पूर्ण खात्री नसलेले फ्रेंचवासीय आता फुटबॉलप्रमाणेच आर्थिक प्रगतीसही चांगलाच वेग लाभेल, अशी आशा बाळगून आहेत. त्यांना आतापासूनच आपणच जगज्जेते होणार, अशी खात्री वाटत आहे. 
फ्रान्सची राजधानी पॅरीसमध्ये जल्लोषास उधाण आले होते. आपण अंतिम फेरी गाठली, त्यावर अनेकांचा सुरवातीस विश्‍वास बसत नव्हता. या संघाने आम्हाला सर्वाधिक धक्का दिला आहे. 1998 पेक्षा ही कामगिरी जास्त प्रभावी आहे, अशीच भावना होती. फ्रान्सने आघाडी घेतल्यापासून आपण अंतिम फेरीत अशा घोषणा सुरू होत्या. आयफेल टॉवर, चॅम्प्स एलिसे, आर्क डे ट्रॉऑम्फे येथे थेट प्रसारित करण्यात आलेल्या लढतीच्या वेळी असलेला उत्साह जबरदस्त होता. बार, कॅफे, रेस्टॉरंट ओसंडून वाहत होते. 
बेल्जियमविरुद्धची उपांत्य लढत संपण्यापूर्वीच काही उत्साही चाहते आता आम्ही इंग्लंडला हरवून जगज्जेते होणार, असे सांगत होते. "आमचे बेल्जियममधील भाऊ कमी पडले. युरोप जिंकत असल्याचा आनंद त्यांनाही आहे. आता इंग्लंडला हरवून विश्‍वकरंडक जिंकणार,' अशीच भावना होती. 

फटाक्‍यामुळे चेंगराचेंगरी, 30 जखमी 
- बेल्जियमविरुद्धची लढत संपण्यापूर्वी नाईस या फ्रान्समधील शहरात फटाक्‍यांची आतषबाजी सुरू. 
- दोन वर्षांपूर्वी इस्लामी अतिरेक्‍यांनी बॅस्ताईल डे साजरा करीत असताना घुसवलेल्या ट्रकच्या हल्ल्याच्या आठवणी जागृत, सर्वत्र पळापळ. 
- फटाक्‍यांचा आवाज गोळीबार वाटल्यामुळे प्रेक्षक सैरावैरा धावण्यास सुरवात. 
- या खास फॅन झोनमध्ये असलेल्या टेबल खुर्च्यांना अडकून काही चाहते पडले. किमान तीस जखमी झाल्याचा कयास. 
- पॅरिसच्या काही भागात बेधुंद चाहत्यांची पोलिसांबरोबर चकमक. 
- बेधुंद चाहत्यांना रोखणाऱ्या पोलिसांना अडथळे तोडत लक्ष्य. 
- काही चाहत्यांनी कारच्या बॉनेटवर जोरदार ठेका धरल्याने बाचाबाची. 
- काही चाहते बसच्या टपावर चढून नाचू लागल्याने पोलिसांचा हस्तक्षेप, वादास निमंत्रण. 

लोकप्रियता उंचावण्यासाठी 
फ्रान्समध्ये अध्यक्ष एमानुल मॅक्रॉन यांची लोकप्रियता घटत आहे. विश्‍वकरंडक विजेते झालो तर त्यांची लोकप्रियता वाढू शकेल, असे मानले जात आहे. मॅक्रॉन उपांत्य लढतीस उपस्थित होते. आता त्यांनी संघास आपण अंतिम लढतीसही येणार आहोत. तुम्ही कप उंचावलेला मला बघायचा आहे, असे सांगितले आहे. 

आर्थिक प्रगतीस साह्य 
विश्‍वकरंडक स्पर्धेतील फ्रान्सच्या वाटचालीचे आर्थिक प्रगतीस साह्य होईल, असा विश्‍वास फ्रान्सचे अर्थमंत्री ले मेईरे यांनी व्यक्त केला. फ्रान्स हा युरोपातील दुसऱ्या क्रमांकाचा आर्थिकदृष्ट्या सक्षम देश आहे. गेल्या काही महिन्यांत फ्रान्सची आर्थिक प्रगती थांबली आहे. विश्‍वकरंडक कालावधीत ब्रिटनमध्येही खरेदी वाढली आहे, पण ती स्पर्धेबाबतच मर्यादित आहे. फ्रान्समध्येही वेगळी परिस्थिती नाही, असे काही अभ्यासकांचे मत आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: French people over excited for world cup final