तंत्रज्ञानामुळे ऑस्ट्रेलियाचा पराभव टळला 

Technology defeats Australia's defeat
Technology defeats Australia's defeat

सामारा : अखेर साडेपाचशे मिनिटांनंतर गोल स्वीकारण्याची वेळ डेन्मार्कवर आली. व्हिडिओ असिस्टंट रेफरींनीच 'डेन्मार्क' हा बचाव भेदला आणि तंत्रज्ञानाची मदत घेत ऑस्ट्रेलियाने हार टाळली. त्याचबरोबर जागतिक फुटबॉल इतिहासात प्रथमच डेन्मार्क ऑस्ट्रेलियातील लढत बरोबरीत सुटली. 

सॉकरुसनी सुरवातीस गोल स्वीकारल्यानंतर केलेला प्रतिकार जबरदस्त होता. त्यांनी सामन्याच्या अंतिम टप्प्यात डेन्मार्क बचावफळीस चांगलेच दडपणाखाली आणले. त्यामुळे एक गुण मिळाल्याचे समाधान त्यांना असेल. निर्णायक टप्प्यात दोन्ही संघांनी आक्रमणे चांगली रचली, पण त्यात भेदकतेचा अभाव होता. कौशल्यापेक्षा उत्साहावर जास्त भर होता. 

जागतिक फुटबॉलमधील उंचाविणारी ताकद असलेल्या डेन्मार्कची सुरवात लौकिकास साजेशी होती. सातव्या मिनिटास ख्रिस्तियन एरिकसनने केलेला गोल नवोदित फुटबॉलपटूंसाठी आदर्श होता. एखादी चांगली चाल कशी फिनिश करावी हेच डेन्मार्कने दाखविले होते. ऍरॉन मूडी याचा चेंडूवरील ताबा निसटला. निकोलाय जॉगरसनने चेंडूवर छान नियंत्रण राखत एरिकसनकडे पास केला. त्याने बचावपटूंतून छान गॅप काढताना हाफ व्हॉलीवर गोल केला. 

पहिल्या गोलनंतर जॉगरसनच्या हेडरचे गोलात रूपांतर झाले नाही हे डेन्मार्कचे दुर्दैव. नेमका त्याच सुमारास सॉकरुसचा प्रतिकार सुरू झाला. मॅथ्यू लालेकी याचा हेडर डेन्मार्कच्या युसूफ पौलसन याच्या हाताला लागला असल्याचे व्हिडिओ सहायक रेफरींनी नजरेस आणून दिले. प्राप्त पेनल्टी किक जेदिनिकने सत्कारणी लावत डेन्मार्क गोलरक्षकास 571 मिनिटांनी गोल स्वीकारण्यास भाग पाडले. यानंतर डेन्मार्क प्रामुख्याने बचावातच गेले आणि त्यांना हार टाळल्याचे समाधान लाभले. 

या बरोबरीच्या लढतीमुळे क गटातील क्रमवारी अखेरच्या फेरीनंतरच निश्‍चित होईल. गटातील चुरस जास्तच वाढली आहे. आघाडीवरील डेन्मार्कला आता बाद फेरीसाठी फ्रान्सविरुद्ध किमान बरोबरी आवश्‍यक असेल, तर ऑस्ट्रेलियाला बाद फेरीसाठी पेरुविरुद्ध विजयच आवश्‍यक असेल. 

- मिले जेदिनाक याचे विश्‍वकरंडक स्पर्धेत तीन गोल, तीनही गोल पेनल्टीवरच. 
- स्पर्धा इतिहासात तीनही गोल पेनल्टीवर असलेला जेदिनाक एकमेव खेळाडू. 
- ऑस्ट्रेलियाकडून विश्‍वकरंडकात सर्वाधिक गोल टीम कॅहीलचे (5), त्याखालोखाल जेदिनाक. 
- जेदिनाकच्या गोलमुळे डेन्मार्क गोलरक्षकाने 571 मिनिटानंतर आंतरराष्ट्रीय गोल स्वीकारला. 
- वर्ल्डकपमधील डेन्मार्कचा सर्वांत वेगवान गोल ख्रिस्तियन एरिकसन याचा. 
- डेन्मार्कच्या गेल्या 13 सामन्यांतील 18 गोलमध्ये एरिकसनचा सहभाग, त्यात 13 गोल. 
- ऑस्ट्रेलिया सलग पाचव्या विश्‍वकरंडक लढतीत विजयापासून वंचित. 
- ऑस्ट्रेलियाने विश्‍वकरंडकातील सलग बाराव्या लढतीत गोल स्वीकारला. या क्रमवारीत तळास असलेल्या सौदी अरेबियाबरोबर. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com