esakal | श्री शंकराची आरती
sakal

बोलून बातमी शोधा

श्री शंकराची आरती

।। श्री शंकराची आरती ।।

श्री शंकराची आरती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा । 
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा । 
लावण्यसुंदर मस्तकी बाळा। 
तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळां ।।1।। 

जय देव जय देव जय श्रीशंकरा । 
आरती ओवाळू तूज कर्पुरगौरा ।।धृ.।। 
कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा । 
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा । 
विभूतीचें उधळण शितिकंठनीळा । 
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ।।2।। 

देवी दैत्यीं सागरमंथन पै केले । 
त्यामाजी अवचित हळहळ जें उठिलें । 
तें त्वां असुरपणें प्राशन केलें । 
'नीलकंठ' नाम प्रसिद्ध झाले ।।3।। 

व्याघ्रांबर- फणिवरधर सुंदर मदनारी । 
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी । 
शतकोटींचे बीज वाचे उच्चारी । 
रघुकुळटिळक रामदासाअंतरी ।।4।।

loading image
go to top