Ganesh aarti | Ganpati Aarti | eSakal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ganesh-banner
पारगाव : दक्षिण कोरिया मध्ये असलेल्या मराठी कुटुंबांनी एकत्र येऊन श्री गणेशाची स्थापना करून मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करत आहे. गणपतीला प्रसाद म्हणून खास उकडीचे व खव्याचे मोदक केले आहे. दक्षिण कोरियातील इंच्योन शहरात नोकरी निमित्ताने असलेले महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील मराठी कुटुंबे एकत्र येऊन २०१९ पासून गणेशोत्सव साजरा करत आहे याही वर्षी अवसरी खुर्द (ता. आंबेगाव ) येथील दीक्षा पाट
दक्षिण कोरियात मराठी कुटुंबांचा गणेशोत्सव
पारगाव : दक्षिण कोरिया मध्ये असलेल्या मराठी कुटुंबांनी एकत्र येऊन श्री गणेशाची स्थापना करून मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करत आहे. गणपतीला प्रसाद म्हणून खास उकडीचे व खव्याचे मोदक केले आहे. दक्षिण कोरियातील इंच्योन शहरात नोकरी निमित्ताने असलेले महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील मराठी कुटुंबे एकत्र येऊन २०१९ पासून गणेशोत्सव साजरा करत आहे याही वर्षी अवसरी खुर्द (ता. आंबेगाव ) येथील दीक्षा पाट
गणपतीची आरती
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।कंठी झळके माळ मुक्ताफळांची ।। १ ।।जय देव जय देव जय मंगलमूर्ति ।दर्शनमात्रे मनःकामना पुरती ।। धृ० ।।
श्री गणपती स्तोत्र
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्भक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ सिध्दये ॥१॥प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम्तृतीयं कृष्णपिङगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम ॥२॥लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव चसप्तमं विघ्नराजेन्द्रं धुम्रवर्णं तथाषष्टम ॥३॥
गणेश आरती
जय गणेश जय गणेश,जय गणेश देवा ।माता जाकी पार्वती,पिता महादेवा ॥ एक दंत दयावंत,चार भुजा धारी ।माथे सिंदूर सोहे,मूसे की सवारी ॥ जय गणेश जय गणेश,जय गणेश देवा ।माता जाकी पार्वती,पिता महादेवा ॥
शांतीमंत्र - इत्युपनिषत्
ॐ भद्रङ् कर्णेभिः शृणुयाम देवाः ।भद्रम् पश्येमाक्षभिर्यजत्राः । स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिःव्यशेम देवहितं यदायुः ।।
गणपती स्तोत्र (मराठी अनुवाद)
साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका |भक्तिने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती ||१||प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तें |तीसरेकृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्त्र तें ||२||पाचवेश्रीलंबोदर सहावे विकट नाव तें |सातवेविघ्नाराजेंद्र आठवे धुम्रवर्ण तें ||३||
पांडुरंगाची आरती
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ।वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ।चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ।। १ ।।जय देव जय देव जय पांडुरंगा ।रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावेजिवलगा ।।जय देव जय देव ।। धृ० ।।
गणपती अथर्वशीर्ष
ॐ नमस्ते गणपतये।  त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि  त्वमेव केवलं कर्ताऽसि  त्वमेव केवलं धर्ताऽसि  त्वमेव केवलं हर्ताऽसि  त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्माऽसि  त्व साक्षादात्माऽसि नित्यम।।1।।ऋतं वच्मि। सत्यं वच्मि।।2।। 
मंत्रपुष्पांजली
ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्‌।  ते ह नाकं महिमान: सचं त । यत्र पूर्वे साध्या: संति देवा:।  ॐ राजाधिराजाया प्रसह्यसाहिने नमोवयं वैश्रवणाय कुर्महे।  स मे कामान्‌ कामाकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु।  कुबेराय वैश्रवणा ।नम:। 
श्री दत्ताची आरती
त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा ।  त्रिगुणीं अवतार त्रैलोक्‍यराणा ।  नेति नेति शब्दें न ये अनुमाना ।  सुरवर मुनिजन योगी समाधि न ये ध्याना ।।1।।  जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता ।  आरती ओवाळितां हरली भवचिंता ।।धृ.।। 
श्री शंकराची आरती
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।  वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ।  लावण्यसुंदर मस्तकी बाळा।  तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळां ।।1।। 
देवीची आरती
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारीं ।  अनाथनाथे अंबे करुणा विस्तारीं ।  वारीं वारीं जन्म-मरणातें वारीं ।  हारीं पडलों आतां संकट निवारीं ।।1।।  जयदेवी जयदेवी जय महिषासुरमर्दिनी ।  सुरवरईश्‍वरवरदे तारक संजीवनी ।।धृ.।। 
go to top