Wed, June 7, 2023

जयदेवी जयदेवी जय महिषासुरमर्दिनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ।।धृ.।।
देवीची आरती
Published on : 2 September 2021, 4:16 am
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारीं ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारीं ।
वारीं वारीं जन्म-मरणातें वारीं ।
हारीं पडलों आतां संकट निवारीं ।।1।।
जयदेवी जयदेवी जय महिषासुरमर्दिनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ।।धृ.।।
त्रिभुवनभुवनीं पाहतां तुजऐशी नाहीं ।
चारी श्रमले परंतु न बोलवे कांहीं ।
साही विवाद करितां पडिलें प्रवाही ।
ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ।।2।।
प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशांपासुनी सोडविं तोडीं भवपाशां ।
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।
नरहरी तल्लिन झाला पदपंकजलेशा ।।3।।