esakal | घरोघरी अवतरले 'इको फ्रेंडली' बाप्पा'
sakal

बोलून बातमी शोधा

घरोघरी अवतरले 'इको फ्रेंडली' बाप्पा'

घरोघरी अवतरले 'इको फ्रेंडली' बाप्पा'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया लाडक्या गणरायाच्या नावाचा जयघोष करत आज गणरायाचं घरोघरी आगमन झालं आहे. त्यानिमित्तान सगळीकडे आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या सावटामुळे गणपती उत्सवावर काही निर्बंध होते. यंदा मात्र परिस्थिती थोडी नियंत्रणात आल्यानं भाविकांनी आरोग्याची योग्य ती खबरदारी घेऊन गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी गणरायाच्या मूर्तींविषयी बोलायचं झाल्यास अनेकांनी पर्यावरणपूरक बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे भाविकांना घराबाहेर पडण्यास मर्यादा होत्या. त्यामुळे त्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. यंदाही त्या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

गेल्या काही वर्षांपासून जलप्रदुषण टाळण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आवाहन अनेक सेवाभावी संस्थांनी केले होते. त्यालाही समाजातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. यंदाच्या उत्सवात बाजारपेठांमध्ये पर्यावरणपूरक श्रींच्या मूर्त्या दिसून आल्या आहेत. त्यात शाडूच्या मातीच्या मूर्त्यांना भाविकांची विशेष पसंती आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या तुलनेत शाडूच्या मातीच्या मूर्त्या या जास्त महाग असल्याचे दिसून आल्या आहेत. मात्र कित्येकांनी यावेळी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उपक्रमाला प्रतिसाद दिला आहे. याबाबत एका मूर्ती विक्रेत्यानं सांगितलं की, गेल्या वर्षी कोरोनामुळे तर उत्सवावर अनेक मर्यादा होत्या. यावेळी भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे.

अनेकांना पर्यावरणपूरक बाप्पा हवा आहे. शा़डूच्या मातीच्या गणेशमूर्ती या महाग आहेत. मात्र त्या घेण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयाचे कौतूक करायला हवे. आपण प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या घेण्याला पसंती दर्शवतो. मात्र प्रत्यक्षात त्यामुळे पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घ्यायला तयार नसतो. याचा विचार करणायाची वेळ आता आली आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये भाविकांच्या मनात झालेलं परिवर्तन हे एका अर्थानं सकारात्मकदृष्ट्या घ्यावं लागेल. अशी प्रतिक्रिया त्या दुकानदारानं दिली. दुकानदार त्याच्या नफ्याचा विचार करताना प्लॅस्टर ऑफ पॅरिसला प्राधान्य देईल. पण एक भाविक आणि सुजाण नागरिक म्हणून कशाची निवड करायची हे आपल्या हातात आहे. असेही त्या दुकानदारानं सांगितलं.

loading image
go to top