esakal | व्यापारी-पोलीस वाद, 'लालबाग राजा'च्या प्राणप्रतिष्ठापना पूजेस विलंब
sakal

बोलून बातमी शोधा

Lalbaugcha Raja

व्यापारी-पोलीस वाद, 'लालबाग राजा'च्या प्राणप्रतिष्ठापना पूजेस विलंब

sakal_logo
By
सुमीत सावंत, मुंबई

मुंबई: जगभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या 'लालबाग राजा'च्या (lalbaugh raja) प्राणप्रतिष्ठापना पूजेस विलंब होत आहे. मुंबई पोलीस (Mumbai police) आणि लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाच्या पदाधिकारी यांच्यात गेली ३० मीनटं चर्चा सुरू आहे. लालबागच्या राजाची स्थापना करणारे स्थानिक व्यापारी (local traders) आणि दुकानदारांना पोलिसांनी नोटीस पाठवून त्यांची दुकानं बंद (shops close) केलीत.

त्यामुळे लालबाग मार्केटमधील स्थानिक रहिवासी प्रचंड नाराज आहेत. लालबागच्या राजाच्या प्रत्यक्ष दर्शनाला पोलिसांनी बंदी घातली आहे. त्यामुळे बाहेरून कोणी भावीक लालबागमध्ये येणार नाही. मग स्थानिक रहिवाश्यांची दुकानं का बंद करण्यात आलीत, असा प्रश्नं लालबाग मार्केट मधील रहिवाशी विचारत आहेत.

हेही वाचा: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती लाईव्ह दर्शन

मुंबई पोलिसांच्या सुरक्षा कारणास्तव लालबाग मार्केटमधील स्थानिक रहिवासी त्रस्त आहेत. त्यांना त्यांच्याच घरी येण्या-जाण्यासाठी पोलिसांकडून अटकाव करण्यात येतोय. त्यामुळे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानेही स्थानिक रहिवाशांच्या मागणीवर ठाम रहात पोलिसांशी मागण्यांवर चर्चा सूरू केलीय. त्यामुळे लालबागचा राजाच्या प्राणप्रतिष्ठापनेस विलंब होतोय.

हेही वाचा: परमबीर सिंह फेसटाइम ID वरुन आरोपींच्या संपर्कात?

दर्शनाची यंदा ऑनलाइन व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनामुळे (corona) मंडपात जाऊन गणरायांचे दर्शन घेण्यावर बंदी घालण्यात आहे. त्यामुळे मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळांनी ऑनलाइन दर्शनाची (online darshan) व्यवस्था केली आहे. 'लालबागचा राजा' दरवर्षी लालबाग मार्केटमध्ये (lalbaugh market) विराजमान होतो. उत्सवाच्या दहा दिवसात देशभरातून कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी इथे येतात.

loading image
go to top