esakal | गौरी-गणपतीच्या सणामुळे फुलांना मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

गौरी-गणपतीच्या सणामुळे फुलांना मागणी

गौरी-गणपतीच्या सणामुळे फुलांना मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गराडे : गणरायाचे आगमन होऊन उद्या (ता.१२) गौरीचे आगमन होत आहे. गौरीपूजन व बाप्पाच्या विसर्जनासाठी विविध फुलांची मागणी वाढली आहे. गतवर्षीच्या तुलनेत कमी पण चांगल्या प्रकारे बाजार भाव मिळत असल्यामुळे चांबळी (ता. पुरंदर) परिसरातील फुलशेती करणारे शेतकऱ्यानी समाधान व्यक्त केले आहे.

चांबळी (ता. पुरंदर) येथे शेवंती, आष्टर, वेलवेट व चांदणी ही फुलशेती करत. यात प्रत्येकी दहा गुंठ्यांवर एक वाण लागवड केला आहे. दरवर्षी एका फुलशेतीतून साधारण कमी-जास्त बाजारभाव पकडत एक लाख रुपये या प्रमाणे ४ लाख रुपयांचे असे उत्पन्न मिळत असल्याने आज ही फूल शेती देतेय माझ्या कुटुंबाला आधार देत आहे, अशी प्रतिक्रिया सेवानिवृत्त एसटी कर्मचारी तुकाराम महादू कामठे यांनी दिली.

सध्या प्रमिला शेवंती हा पिवळ्या रंगाच्या फुलांचा चांगली मागणी आहे. प्रमिला शेवंतीचा दर पाच दिवसांनी तोडा होतो. एका तोड्याला साधारण ८० रुपये किलो माल मिळतो. असा हा वाण ४ महिने चालतो. एका महिन्याला ६ तोडे याप्रमाणे या फुलशेतीतून साधारण एका पिकाला खर्च वजा जाता व कमी-जास्त बाजार भाव पकडता. लाखभर रुपये उत्पन्न मिळत असल्याचे शेतकरी तुकाराम कामठे यांनी सांगितले. या फुलशेतीसाठी घरातील वंदना कामठे, रूपाली कामठे, ओमकार कामठे, अंतरा कामठे, भाऊसाहेब कामठे यांची यात सातत्याने मदत असते.

वार्षिक १५ लाखांची उलाढाल

कार्नेशन, जरबेरा व जिप्सो ही ८० गुंठे क्षेत्रावर दिवे येथे पॉलीहाउसमध्ये फुलशेती केली असून सध्या कार्नेशन ३० गड्डी २५० रुपये प्रति गड्डी, जरबेरा २०० ते २५० गड्डी प्रत्येकी ५० रुपये तर जिप्सो ४० ते ५० गड्डी २५० रुपये असा माल व बाजार भाव मिळत असून हे सर्व तोडे दिवसाआड होतात. याची एकूण वार्षिक उलाढाल पाहिली तर १० लाख ते १५ लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याचे पुरंदर पंचायत समितीचे माजी शिक्षण विस्ताराधिकारी व फुलशेतीचे शेतकरी अशोक टिळेकर यांनी सांगितले.

गणपती उत्सवाच्या अगोदर शेवंतीला ६० ते ७० रुपये किलो असा बाजार होता. पण हा बाजार भाव बदलला असून आज सकाळी १०० रुपये किलो गेला. उद्या गौरी गणपतीच्या पुढील तीन दिवसात आणखी बाजार वाढण्याची शक्यता आहे.

- भाऊसाहेब कामठे, चांबळीचे माजी तंटामुक्त अध्यक्ष, फुलशेतीचे उत्पादक

loading image
go to top