esakal | त्वं ज्ञानमयः विज्ञानमयः
sakal

बोलून बातमी शोधा

त्वं ज्ञानमयः विज्ञानमयः

त्वं ज्ञानमयः विज्ञानमयः

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- डॉ. आर्या जोशी

पाशांकुशवरद हस्त। एके करी मोदक शोभत।

मूषकावरि अति प्रीत। सर्वांगी सिंदूर चर्चिला।।

असे गणपतीचे मोहक रूप.

गणपतीचा मोठा आकार पाहता तो एका चिमुकल्या उंदरावर स्वार होतो ही कल्पना आश्चर्यकारक वाटते. परंतु तरीही बालगोपाळांना गणपतीसह असलेल्या या उंदीरमामाचे विशेष आकर्षण असते.

गणेश पुराणात एक आख्यायिका आहे. एक गंधर्व होता. त्याचं नाव क्रौंच. इंद्रदेवाच्या सभेत एकदा तो फिरत असताना चुकून त्याचा पाय वामदेवाला लागला. वामदेव लगेच रागावून त्याला म्हणाले की ‘‘तू उंदीर होशील.’’ उंदीर झालेला तो गंधर्व पराशर ऋषींच्या आश्रमात आला आणि तिथले सगळे पदार्थ खायला सुरूवात केली. हे पाहून पराशर ऋषी गोंधळले.

या संकटातून सोडविण्यासाठी पराशरांनी गणेशाची प्रार्थना केली. गणेश प्रकटला आणि त्याने उंदराला वर मागण्यास सांगितले. परंतु उन्मत्त उंदराने गणपतीलाच सांगितलं की ‘‘तूच मला वर माग.’’ हे ऐकून गणपती रागावला आणि आजपासून तू माझे वाहन हो असा आदेश त्याने उंदराला दिला.

हेही वाचा: प्रथम तुला वंदितो...!

उंदीर हा गणपतीचे वाहन कसे बनला असावा याची या प्रातिनिधीक आख्यायिकेच्या आधारे कल्पना येते.गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी उंदीरमामाला खिरीचा नैवेद्य दाखविण्याची पद्धतीही लोकसंस्कृतीत रूढ असलेली दिसून येते.

चंचल, सतत इकडून तिकडे धावणारा असा हा मूषक अज्ञानाचे प्रतीक. ज्ञानाची, विद्येची देवता असलेला गणपती त्यावर आरूढ होतो. ज्ञानाने अज्ञानावर मिळविलेला विजय हे गणपतीचे गुणवैशिष्ट्य या रूपकातून दिसून येईल. ज्ञानाची उपासना करायची असेल तर भौतिक वस्तूंचा मोह टाळत, एकाग्र चित्ताने, स्वस्थपणाने, एका जागी बसून अभ्यास करणे, मनाची धावपळ कमी करणे, चिंतन करणे महत्त्वाचे आहे हे या रूपकातून शिकण्यासारखे आहे.

loading image
go to top