esakal | इचलकरंजीत 10 हजार गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन
sakal

बोलून बातमी शोधा

गणपतींना पर्यावरणपूरक निरोप

इचलकरंजीत 10 हजार गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात शहरांतील 30 कृत्रिम कुंडावर 10 हजार घरगुती गणपतींना पर्यावरणपूरक निरोप देण्यात आला. दुपारनंतर शहरातील शहापूर खण विसर्जन स्थळाचा परिसर गजबजून गेला होता. रात्री उशिरापर्यंत शांततेत गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. पर्यावरणपूरक विसर्जनसाठी सलग दुसऱ्या वर्षी भाविकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

पालिका क्षेत्रातील शहापूर खणीत विसर्जन स्थळ निश्चित करून 30 ठिकाणी कृत्रिम कुंडाची व्यवस्था करण्यात आली होती.गौरी विसर्जनासाठी खास सोय होती. गौरी आणि गणपतींना मंगळवारी भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. विसर्जन ठिकाणी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवल्याने सोहळा शांततेत पार पडला. विसर्जनासाठी भाविकांची सकाळपासूनच लगबग सुरू होती. दुपारनंतर घरगुती विसर्जनासाठी वर्दळ वाढली. पालिका क्षेत्रातील प्रभागांमध्ये 30 विसर्जन कुंडात नागरिकांनी गणेश विसर्जन करत पर्यावरण वाचवण्याचा संदेश दिला. दरम्यान शहापूर खणीवर अप्पर पोलीस अधीक्षक सौ.जयश्री गायकवाड, नगराध्यक्षा सौ.अलका स्वामी यांनी भेट देऊन पाहणी केली.

हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात पोहोचले; महत्वाची बैठक सुरु

पंचगंगा नदीवर विसर्जनावर यावर्षीही बंदी घातल्याने नदीकाठ परिसर सूनसुना वाटत होता.नदिवेस नाका येथे पोलीस बंदोबस्त तैनात करून वाहनांची तपासणी केली जात होती.शहापूर खणीवर चोख नियोजन केल्याने विसर्जन सुलभ होताना दिसले.विसर्जनासाठी खणीवर तीन ठिकाणी मार्ग खुले करण्यात आले. नदीच्या पात्रात तीन बोटींसह आपत्कालीन यंत्रणा सज्ज होती.वाहतुकीचे योग्य नियोजन केल्याने वाहतूक कोंडी टळली.पंचगंगा नदीवरून शहरात येणारा मार्ग एकेरी करण्यात आला.ही वाहतुक आवाडे सबस्टेशन मार्गाने शहरात वळवली.पावसाने उसंत घेतल्यामुळे गणेशभक्तांना गणपती व गौराईला उत्साहाने निरोप देता आला. भरजरी साडी आणि दागदागिने घालून सजवलेल्या माहेरवाशिणी गौराईची प्रसादाच्या शिदोरीसह पाठवणी केली

loading image
go to top