esakal | गडहिंग्लज: गौरी गणपती विसर्जनासाठी २२ कृत्रिम कुंड
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज: गौरी गणपती विसर्जनासाठी २२ कृत्रिम कुंड

गडहिंग्लज: गौरी गणपती विसर्जनासाठी २२ कृत्रिम कुंड

sakal_logo
By
टीम ई सकाळ

गडहिंग्लज: कोरोना निर्बंधाच्या पार्श्‍वभूमीवर उद्या (ता. १४) होणाऱ्या घरगुती गौरी गणपती विसर्जनाचे गडहिंग्लज पालिकेने नियोजन केले आहे. शहरात विविध २२ ठिकाणी कृत्रिम कुंडाची व्यवस्था केली असून या व्यतिरिक्त इतरत्र कुठेही विसर्जनास परवानगी दिली जाणार नाही. यामुळे नागरिकांनी नियोजित ठिकाणी विसर्जन करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी केले आहे.

हेही वाचा: सोयाबीनवर तांबेऱ्याचा प्रादूर्भाव; शेतकऱ्यांमागे संकटांची मालिका

कोरोनामुळे विसर्जनासाठी कुठेही गर्दी होणार नाही, याची काळजी प्रशासनाने घेतली आहे. गौरी गणपती विसर्जनासाठी नागरिकांची होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी पालिकेने नियोजन केले आहे. प्रत्येक नागरिकांनी या नियोजनात सहभागी होवून प्रशासनाला सहकार्य करावे. निश्‍चित केलेल्या २२ ठिकाणांव्यतिरिक्त इतरत्र कुठेही विसर्जन करु नये. त्यासाठी परवानगीही दिली जाणार नाही. यामुळे नागरिक व गणेश भक्तांनी निश्‍चित केलेल्या ठिकाणीच गौरी गणपतीचे विसर्जन करावे.

विसर्जनासाठी निश्‍चित ठिकाणे अशी

पिराजी पेठ, भीमनगर (सलवादे चौक), मार्केट यार्ड (राजर्षी शाहू पुतळ्याजवळ), हाळलक्ष्मी मंदिर (गर्दे विहिरीजवळ), आझाद कॉर्नर (डॉ. राजेंद्र प्रसाद रोड कॉर्नर), शासकीय विश्रामगृह कडगाव रोड, सरस्वती नगर, राधाकृष्ण मंदिरसमोरील शहीद चौगुले उद्यान, मगदूम कॉलनी (लायन्स ब्लड बँकेजवळ), महालक्ष्मी मंदिर (स्टेज समोर), घाळी कॉलनी (तेली यांच्या घरासमोर), भैरी रोड (मारुती मंदिर शेजारी), एसटी कॉलनी (ओंकार प्राईड शेजारी), शिवाजी चौक, सिटी बझार, गुर्जर वसाहत (मारुती मंदिरजवळ), चर्च रोडवरील नाना नानी पार्क, गांधीनगरात गणेश मंगल कार्यालयासमोरील ओपन स्पेस, अयोध्यानगरातील अयोध्या पार्क, कासार गल्लीतील एकता तरुण मंडळजवळ, माणिकबाग, नदीवेस विसर्जन कुंड.

loading image
go to top