esakal | विदर्भात उभारली उजव्या सोंडेच्या गणपतीची मंदिरे
sakal

बोलून बातमी शोधा

विदर्भात उभारली उजव्या सोंडेच्या गणपतीची मंदिरे

विदर्भात उभारली उजव्या सोंडेच्या गणपतीची मंदिरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धामणगाव रेल्वे (जि. अमरावती) : शुक्रवारपासून गणेशोत्सवाला उत्साहात प्रारंभ होत आहे. घरोघरी मातीच्या गणेशमूतींची स्थापना होईल. घरी बसणारी मूर्ती असो की, मंदिरात बसविण्यासाठीची मूर्ती, एक बाब प्रकर्षाने पाहिल जाते, ती म्हणजे मूर्तीची सोंड. डाव्या सोंडेचाच गणपती निवडला जातो. उजव्या सोंडेंच्या गणपतीच्या पूजेसाठीची पूजाअर्चना करतानाची शुद्धता कडकपणे पाळावी लागते, अशी भावना आहे. त्यामुळे तसा गणपती कुणीही स्थापन करीत नाही. मात्र धामणगाव रेल्वे (जि. अमरावती) येथील जे. बी. फर्मने उजव्या सोंडेच्या गणपतीची तब्बल १६ मंदिरे विदर्भात बांधली.

जयरामदास भागचंद (जे. बी.) फर्मचे स्व. भागचंद अग्रवाल यांची गणपतीवर श्रद्धा होती. त्यांच्या फर्मद्वारे विदर्भभर जिनिंग मिल चालविल्या जायच्या. त्यांच्या दोन मिल धामणगावातही होत्या. तसेच धामणगावात कापसाची मोठी बाजारपेठ होत. त्यामुळे अनेक राज्यांमधील व्यापारी धामणगावात व या मिलमध्ये यायचे. मिलमध्ये कामगारही मोठ्या संख्येत होते. तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या चालकांची गर्दी असायची. साऱ्यांचीच श्रद्धा गणपतीवर होती. म्हणूनच स्व. भागचंदजींनी फर्मच्या विदर्भातील १६ जिनिंग मिलच्या परिसरात उजव्या सोंडेंच्या गणपतीची मंदिरे उभारली. धामणगावात जुन्या जेबी व केजीटीआय जिनिंग मिल परिसरात ही मंदिरे आहेत. वर्धा, आर्वी, अमरावती, यवतमाळ येथेही ही मंदिरे आहेत.

हेही वाचा: जेवण केल्यानंतर सुस्ती का येते? जाणून घ्या कारण...

येथे काम करणारे कामगार, हमाल, तसेच व्यापारी या गणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय कामाला सुरुवात करीत नव्हते. अनेक कामगार दुपारचे जेवण करण्यापूर्वी आणलेल्या डब्यामधून नैवेद्य ठेवत असत. उजव्या सोंडेची अशी मूर्ती सहजपणे कुणीही कारागीर तयार करीत नाही. विशेषत: या मूर्तीची पूजाअर्चा नित्यक्रमाने करताना चार ते पाच तासांचा अवधी लागतो.

गणेशचतुर्थीदरम्यान दहा दिवस मोठ्या उत्साहाने येथे गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. या मंदिरात दर महिन्याच्या चतुर्थीला शहरातील भाविक दर्शनाला येतात. दिवाळीनंतर अन्नकुट करण्यात येत असते. या गणेशाचे दर्शन घेतल्याशिवाय कोणत्याही कार्याला आम्ही सुरुवात करीत नाही.
- शरदकुमार अग्रवाल, जयरामदास भागचंद फर्म
loading image
go to top