esakal | जेवण केल्यानंतर सुस्ती का येते? जाणून घ्या कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

जेवण केल्यानंतर सुस्ती का येते? जाणून घ्या कारण...

जेवण केल्यानंतर सुस्ती का येते? जाणून घ्या कारण...

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : दुपारचे जेवण झाले की आळस येणे, सुस्ती येणे, डुलकी घ्यावीशी वाटणे किंवा झोप येणे, असा अनुभव अनेकदा घेतला असेल. खास करून सणावाराच्या दिवशी गोडधोड खाल्ल्यानंतर वा जड जेवण झाल्यानंतर असा अनुभव येतोच. हा तर सर्वांचाच अनुभव आहे. यासाठी पूर्वी भोजनानंतर वामकुक्षी घ्यावी म्हणजे डाव्या कुशीवर झोपावे असे म्हणतात...

काही लोकांना दुपारचे जेवण केल्यानंतर झोप घेण्याची सवय असते. परंतु, नोकरी करणाऱ्या, ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी मात्र हे कदापि शक्य होत नाही. दुपारच्या जेवणाआधीची सक्रियता आणि दुपारच्या जेवणानंतरची सक्रियता यात फरक असतो. परंतु, असे का होत असेल याचा कधी तुम्ही विचार केलाय का?

हेही वाचा: रात्री पावसाने धो-धो धुतले; शेतीचे झाले तलावात रूपांतर

दुपारचे जेवण केल्यावर झोप येण्याचे कारण पचनतंत्राशी संबंधित आहे. जेवण केल्यानंतर जेव्हा शरीरात पचनक्रिया सुरू होते तेव्हा पचन संस्थांना अन्न पचवण्यासाठी अतिरिक्त ऊर्जेची गरज असते. अन्न पचवण्यासाठी त्यांना अतिरिक्त एंजाइमचा स्राव करावा लागतो. ही गरज रक्तातून भागवली जाते. अशा स्थितीत रक्तप्रवाह पचनसंस्थांकडे अधिक वळवला जातो. परिणामी मेंदूला होणारा रक्तप्रवाह कमी होतो.

दुपारी ऑफिस, शाळा किंवा कोठेही असलो आणि भरपेट जेवण घेतले की सुस्ती चढते. कशातच मन लागत नाही. आराम करण्याची इच्छा होते. परंतु, तस करता येत नाही. कंटाळा करीत वेळ ढकलावा लागतो. परंतु. काही घरी जाण्याच्या वेळेस मात्र पुन्हा आपण फ्रेश होतो आणि गाडी पूर्वपदावर येते. हे होण्यामागे शास्त्रीय कारण आहे.

हेही वाचा: लोकांना जोडत कामे केल्याने गवसला मार्ग; सुनीलची वेगळी वाट

शरीराला कार्य करण्यासाठी ऊर्जेची गरज असते आणि ही ऊर्जा मिळते अन्नामधून. जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा पचनक्रियेच्या माध्यमातून ते शरीराला आवश्यक असणाऱ्या ऊर्जेमध्ये परावर्तित होते आणि जेव्हा आपण जास्त खातो तेव्हा स्वादुपिंड रक्तामध्ये शुगरचे प्रमाण संतुलित राहावे म्हणून इन्सुलिन बनवते.

कर्बोदके हेही कारण

सुस्ती येण्यामध्ये कर्बोदकाचा देखील हात असतो. ज्या पदार्थांमध्ये कर्बोदके जास्त प्रमाणात असतात, त्या पदार्थांमधील कर्बोदकाचे पचन करण्यासाठी शरीराला जास्त ऊर्जा खर्च करावी लागते. शरीराची ६०-७५ टक्के ऊर्जा केवळ कर्बोदकाचे पचन करण्यासाठी वापरली जाते. अति प्रमाणात खाल्ले तरीही अन्नाची पचनक्रिया पूर्ण होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जा आणि वेळ लागतो. हेच कारण आहे की जेवण केल्यावर लगेच सुस्ती येते.

हेही वाचा: मुलांमधील हट्टीपणा असा करा कमी

उपाय

  • दुपारच्या जेवणात कमीत कमी कॅलरी घ्या

  • हलका आहार घ्या

  • जास्त कॅलरी असलेला आहार घेतल्याने जास्त झोप येते

  • दुपारच्या जेवणात तळलेले पदार्थ आणि पचायला जड पदार्थ यांचा समावेश टाळा

loading image
go to top